मुंबई - कोरोनाची लागण होऊन मृत्युमुखी पडणाऱ्या डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात आतापर्यंत 500 हुन अधिक डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. तर यातील 56 डॉक्टर हे महाराष्ट्रातील आहेत. मृत आणि कोरोनाग्रस्त डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना राज्य सरकार मात्र डॉक्टरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहे. त्यात मृत डॉक्टरांना विम्याची रक्कमही देत नाही. यावर इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रने नाराजी व्यक्त केली आहे.
खासगी डॉक्टरांची अवहेलना थांबवा! कोरोनामुळे 56 डॉक्टरांचा बळी गेल्यानंतरही सरकार गंभीर नाही - आयएमए - डॉक्टरांचा विमा
कोरोनामुळे देशभरात ५०० हून अधिक डॉक्टरांचा बळी गेला आहे. यातील ५६ डॉक्टर महाराष्ट्रातील आहेत. मात्र राज्य सरकार मृत डॉक्टरांच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम नाकारत आहे. सरकारने विम्याचा आणि डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी आयएमए महाराष्ट्रने केली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन
खासगी डॉक्टरांची अवहेलना थांबवा, असे म्हणत विम्याचा आणि डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी आयएमए महाराष्ट्रने केली आहे. तर हा प्रश्न निकाली निघाला नाही तर आयएमए महाराष्ट्रला कडक भूमिका घ्यावी लागेल असा इशाराही दिला आहे.
Last Updated : Oct 6, 2020, 6:50 PM IST