महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kishori Pednekar : बाळासाहेबांच्या सानिध्यात खूप लोक घडले, मग हे का बिघडले;पेडणेकरांची टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषण केले. मात्र, यातील काहीच कळले नाही. भाजपाने लिहून दिलेली स्क्रिप्ट होती. (Kishori Pednekar On Raj Thackeray ) या भाषणानंतर अनेक मनसैनिकांनी आम्हाला सांगितले की मोरी तुंबली आहे. वाटले काही तरी निघेल पण हे तर भाजपचे गांडूळ निघाले असा टोला माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

By

Published : Apr 3, 2022, 1:24 PM IST

माजी महापौर किशोरी पेडणेकर
माजी महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई - काल गुढीपाडव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषण केले. मात्र, यातील काहीच कळले नाही. भाजपाने लिहून दिलेली स्क्रिप्ट होती. या भाषणानंतर अनेक मनसैनिकांनी आम्हाला सांगितले की मोरी तुंबली आहे. वाटले काही तरी निघेल पण हे तर भाजपचे गांडूळ निघाले असा टोला माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. किशोरी पेडणेकर यांनी दादर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील स्मारक असलेल्या शक्तीस्थळाला भेट दिली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

किशोरी पेडणेकर

भाजपचे गांडूळ निघाले असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला - कालचा दिवस मुंबईकारंसाठी चांगला दिवस होता. नववर्ष सुरु होते आणि त्याचं वेळेला मुख्यमंत्री यांनी काल मराठी भाषा भवनचे भूमिपूजन केले. मेट्रोच लोकार्पण केले, अजून पुढच्या मेट्रोच लोकार्पण होणार आहे. आदित्य ठाकरे यांची शाळेची तळमळ दिसून येते. (Kishori Pednekar Critisaise against Raj Thackeray) मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणात काही कळले नाही. कालच भाषण भाजपने लिहून दिलेली स्क्रिप्ट होती. आम्हालाही लोकं विचारतात लाव रे तो विडिओ. शिवसेनेचा द्वेष करण्यासाठीं स्वतःचा पक्ष काढला का? असे प्रश्न उपस्थित करत बऱ्याच मनसैनिकांनी आम्हाला सांगितले की मोरी तुंबली आहे यामुळे वाटले होते की काही तरी निघेल पण हे तर भाजपचे गांडूळ निघाले असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे.

डुब्लिकेट लोकांचे उत्तराधिकारी होण्याचे काम नाही -कालचं राज ठाकरे यांचं भाषणं ऐकून रात्री उद्वेग झाला. घरच्यांचाही इतका द्वेष कोणी करू शकतो का? बाळासाहेबांच्या छायेत अनेकजण घडले मग हेच कसे काय बिघडले हेच कळले नाही. भाजप त्यांना मांडीवरही घेत नाही अन नाही खांद्यावरही घेत. असही त्या म्हणाल्या आहेत. मुंबईत शिवसेनेचा द्वेष करून कोणीही मोठे झाले नाहीत. बाळासाहेबांचे उत्तराधिकारी उद्धव ठाकरेचं आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बाकी, डुब्लीकेट लोकांचे उत्तराधिकारी होण्याचे काम नाही असा टोलाही पेडणेकर यांनी लगावला आहे.

उद्धव यांच्याशी नाळ जोडली असती तर - आपण मुख्यमंत्री यांचे काम पाहिले आहे. आम्ही कामाचा विकासाचा धडाका लावला, कोरोना कमी होताच आम्ही लोकार्पणची कामं सुरु केली आहेत. ज्या पक्षासोबत उद्धव ठाकरे युतीत होते त्यात काय घडले हे सगळ्यांना माहित आहे. जर राज ठाकरे यांनी ठाकरे म्हणून उद्धव यांच्याशी नाळ जोडली असती तर आज सगळे ठीक असते. आम्ही आमच्या कर्माने लोकांचे भले कसे होईल याचा विचार करतो. मनसेच्या पोटदुखी कोणता चूर्ण देता येईल हे पाहावे लागेल असही पेडणेकर म्हणाल्या आहेत.

शिवसेना टार्गेट वर - स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर टाकण्यात आलेल्या धाडी संदर्भात बोलताना, मी १०० टक्के सांगेन या कायद्याच्या लढाया आहेत. कायद्याची लढाई शिवसेना लढेल. जर मुंबईत भ्रष्टाचार दिसतो तर पुण्यात देखील आहे ते का सांगत नाहीत. फक्त शिवसेना टार्गेटवर आहे असही त्या म्हणाल्या आहेत.

ही भाजपाची बी टीम - आपण ध्वनीप्रदूषण नको म्हणतो, मग त्याचा चाप त्यांनाही बसला पाहिजे. त्याच्यावर राजकारण करून पोळ्या भाजण योग्य नाही. ही भाजपची बी टीम म्हणून नव्याने तयार झाली आहे, आणि स्क्रिप्ट वाचन त्यांचे काम सुरु झाले आहे. उद्धव ठाकरे सहनशिल आहेत. मात्र, तुम्ही काही टीका कराल आणि आम्ही ऐकू असं काही नाही, आता आम्ही उत्तर देऊ. आरएसएसने पण सांगितले की हिंदु कसा असावा, जो भूमिपुत्रांना न्याय नाही देत तो देशद्रोही असतो. उगाचच हिंदू कार्ड लावून मतं वाढणार नाही. कालच्या ९५ टक्के शोभायात्रा शिवसेनेच्या होत्या असे पेडणेकर यांनी सांगितले.

हेही वाचा -Raj Thackeray : राज कडाडले! राजकीय नेत्यांवर घणाघात; मतदारांचेही टोचले कान

ABOUT THE AUTHOR

...view details