महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Amazon Help Quality of Education : शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी ॲमेझॉनची सहकार्य करणार?, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती - Amazon help to improve education

सर्व शासकीय शाळांमधून तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षण, अभ्यासक्रम तयार करण्यासाठी सूचना करणे यासाठी ॲमेझॉनने सहकार्य करण्यास तयारी दर्शविली आहे. (Amazon's help in improving the quality of education) त्याची सुरूवात प्रातिनिधीक स्वरूपात टॅब वितरण करून झाल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

By

Published : Jan 29, 2022, 1:30 AM IST

मुंबई - राज्यातील सर्व शासकीय शाळांमधून तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षण, अभ्यासक्रम तयार करण्यासाठी सूचना करणे यासाठी ॲमेझॉनने सहकार्य करण्यास तयारी दर्शविली आहे. (Education Minister) त्याची सुरूवात प्रातिनिधीक स्वरूपात टॅब वितरण करून झाल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

चर्चासत्राचे आयोजन-

राज्यात शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. (Amazon's help Education) याचाच एक भाग म्हणून तांत्रिक सहकार्यासाठी ॲमेझॉनने सहकार्य करण्यास तयारी दर्शविली आहे. यासंबंधी वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. (Amazon Help Quality of Education) यावेळी विधानसभा सदस्य रोहीत पवार, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, ॲमेझॉन इंडियाचे संचालक सलीम मेमन, ॲमेझॉन सीएसआरच्या प्रमुख मनिषा पाटील, फ्युचर इंजिनिअरचे प्रमुख अक्षय कश्यप, पब्लिक रिलेशन्स टीमच्या माधवी कोचर, लिडरशीप फॉर इक्व‍िटीचे मधुकर बानुरी, पब्लिक पॉलिसीच्या स्मृती मिश्रा यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण-

विद्यार्थ्यांना शिक्षणात तंत्रज्ञानाची मदत होण्यासाठी ॲमेझॉन सहकार्य करणार आहे. याअंतर्गत राज्यात 488 आदर्श शाळांमधील विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण, संगणकशास्त्रातील कोडिंग लॅब, ॲमेझॉनच्या मुलींच्या शिष्यवृत्तीमध्ये अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थिनींचा समावेश करण्याची तयारी, सर्व शासकीय शाळांमधील शिक्षकांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, पुणे येथे सायन्स सिटीच्या उभारणीमध्ये तंत्रज्ञानाची मदत, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत 2022 पासून तंत्रज्ञान आधारित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी मदत करणे, प्रशिक्षण देणे या कामी ॲमेझानचे सहकार्य लाभणार आहे.

प्रातिनिधीक स्वरूपात टॅब चे वितरण -

शालेय शिक्षण विभागामार्फत डिजिटाईज्ड वर्ग केले जाणार आहेत. यामध्ये देखील ॲमेझॉनच्या सहकार्याची सुरूवात म्हणून मुंबईच्या धारावी मधील महानगरपालिकेअंतर्गत शाळांमधील 769 विद्यार्थ्यांना टॅब दिले जाणार असून नियमित अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा उपयोग करता येणार आहे. आज हिंदी माध्यमिक शाळा (संत कक्कया शाळा इमारत) दादर, काळा किल्ला मराठी प्राथमिक शाळा, काळा किल्ला एमपीएस माध्यमिक, टी.सी.मनपा मराठी माध्यमिक शाळा, टी.सी.मनपा उर्दू माध्यमिक शाळा, टी.सी.मनपा इंग्रजी माध्यमिक या शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात टॅबचे वितरण करण्यात आले.

हेही वाचा -दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार?, राज्यमंत्री बच्चू कडू यांचे संकेत

ABOUT THE AUTHOR

...view details