महाराष्ट्रातील निवडणूकपूर्व आढावा
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान एका आठवड्यावर येऊन ठेपले आहे. सर्व पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात रविवारी पहिली जाहीर प्रचारसभा घेतली. येत्या ४ दिवसांत ते आणखी ४ सभा घेणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधींनीही एकाच दिवसांत ३ जाहीर सभा घेतल्या.
यंदाच्या प्रचारामध्ये २ बाबी लक्षवेधी ठरल्या. एक म्हणजे - प्रत्येक पक्षाने मतदानाच्या ४ महिने आधीपासूनच 'प्रचार यात्रा' सुरू केल्या. लोकसभा निवडणूक मे महिन्यात संपल्यानंतर लगेचच सर्व पक्ष पुन्हा एकदा निवडणुकीच्या तयारीला लागले. देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा, आदित्य ठाकरेंनी जन आशीर्वाद यात्रा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिव स्वराज्य यात्रा काढल्या.
या सर्व गोष्टी घडत असल्या तरी आणखी एक गोष्ट घडली ती म्हणजे मागील निवडणुकांच्या तुलनेत या वेळचे वातावरण तितकेसे तापलेले नाही. तसेच, विरोधी पक्षा सध्या राज्यात सत्तेत असलेल्या भाजप-सेना युतीला एकदाही बॅकफूटवर घालवू शकलेले नाहीत. ही बाब नक्कीच विलक्षण ठरली आहे.
मुद्दे तर आहेत, पण...
विरोधकांकडे मुद्देच नाहीत किंवा त्यांनी प्रयत्नही केला नाही, अशी स्थिती नाही. उदाहरणार्थ, राज्यात शेती आणि शेतकऱ्यांवर मोठी कुऱ्हाड कोसळलेली आहे. उत्तर महाराष्ट्रात राज्यातील ८० टक्के कांदा पिकतो. कांदा निर्यातीवर सरकारने घातलेल्या बंदीविरोधात शेतकरी निदर्शने करत आहेत. कांद्याला जादा भाव मिळणे शक्य होते. मात्र, या बंदीमुळे आपले नुकसाने झाले असा त्यांचा आक्रोश आहे. विरोधकांनी आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसने हा मुद्दा उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचं भांडवल करण्यात ते अपयशी ठरले.
ऑगस्टमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला. शिवाय, यात ऊस आणि इतर पिकांचेही कोट्यवधींचे नुकसान झाले. मात्र, राज्य सरकारकडून वेगाने हालचाली झाल्या नाहीत आणि शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात मदत करण्यात ते अपयशी ठरले. दुसऱ्या बाजूला मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये मान्सूनमध्येही दुष्काळी परिस्थिती होती.
अजित पवार, अशोक चव्हाण हे विरोधी पक्षातील नेते त्यांच्या भाषणांमधून हे मुद्दे उपस्थित करत आहेत. मात्र, या दोषांचे माप सरकारच्या पदरात टाकण्यात ते अपयशी ठरत आहेत. याचे कारण मागील १५ वर्षे हे सत्तेत होते आणि त्या वेळची परिस्थिती आणि त्यावेळचे मुद्दे त्यांच्यावरच उलटत आहेत. उदाहरणार्थ, विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला की, देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर यूपीएच्या कर्जमाफी योजनेत मोठ्या प्रमाणात अयोग्य लाभधारकांना कर्जमाफी दिली गेल्याचा मुद्दा उपस्थित करतात.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार सर्व विरोधकांच्या फौजेच्या प्रचारात अग्रभागी आहेत. नुकतेच राज्य सहकारी बँक घोटाळ्यात ईडीकडून (अंमलबजावणी संचलनालय) त्यांचे नाव समोर आले होते. पवार हे कधीही या बँकेचे संचालक किंवा साधे सदस्यही नव्हते. त्यामुळे या घोटाळ्यात ईडीकडून नाव समोर आल्यानंतर ईडीकडून हजर राहण्याचे निर्देश मिळण्यापूर्वीच त्यांनी स्वतःहून चौकशीला उपस्थित राहण्याचा पवित्रा घेतला. यामुळे ईडीलाच बचावात्मक पवित्रा घेणे भाग पडले. तसेच, फडणवीस सरकारलासाठीही अडचणीची स्थिती निर्माण झाली. पवार सध्या ७९ वर्षांचे असून भाजपसमोर ही बाब वारंवार उपस्थित करत आहेत. यातून सत्ताधारी पक्ष विरोधकांना कशा प्रकारे खोट्या प्रकरणांमध्ये अडकवून अडचणीत आणत आहे, हे पवार दाखवून देत आहेत. यामुळे संपूर्ण राज्यभरातून त्यांना सहानुभूती मिळताना दिसत आहे.
सध्या पवार हेच एकमेव अशी व्यक्ती आहेत, जे विरोधकांमध्ये उभे राहून राज्यातील कुढल्याही ठिकाणच्या जनतेचं लक्ष वेधून घेत आहेत. त्यांनी तरुणांसह विविध वर्गातून प्रतिसाद मिळत आहे. यामुळे त्यांना राज्यभरातील माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थान मिळत आहे.
नेतृत्वहीन काँग्रेस
सध्या काँग्रेस पक्ष पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. त्यांच्या प्रचाराचे नेतृत्व करण्यासारखा सक्षम नेता त्यांच्याकडे नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (भोकर-नांदेड) आणि पृथ्वीराज चव्हाण (कराड-सातारा) यांनी संपूर्णपणे स्वतःच्या मतदार संघांवर लक्ष केंद्रीत केले आहे. सुशीलकुमार शिंदे सोलापुरात त्यांच्या मुलीच्या राजकीय भवितव्याविषयी चिंतेत आहेत. मुंबईत संजय निरुपम, मिलिंद देवरा हे बाहेर फेकले गेले आहेत. सध्याचे कार्यकारी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे कोणीच ऐकत नाही, अशी स्थिती आहे.
त्यांच्यातील राधाकृष्ण विखे-पाटलांसारखे बहुतांशी तगडे नेते भाजप-शिवसेनेत गेले आहेत. यामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले आहे. तरीही काँग्रेस (१४६) म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा (११८) जास्त जागांवर निवडणूक लढवत आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे निवडणूक जाहीरनामे अगदीच सामान्य आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी, २१ हजार रुपये किमान वेतन, सर्व गरीब कुटुंबांना नोकऱ्या आणि अशाच प्रकारच्या योजना आहेत. मात्र, मतदारांना खेचून घेईल, अशी कोणतीच बाब त्यात नाही. गंमत म्हणजे, या दोन्ही पक्षांचे नेते त्यांच्या भाषणांमध्ये या आश्वासनांविषयी काहीच बोलत नाहीत.
स्टार प्रचारक आणि आर्टिकल ३७०