महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भीमा कोरेगाव प्रकरण : आयोगाने रश्मी शुक्ला यांची साक्ष आज नाही नोंदवली - Bhima koregaon matter

भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी ( Bhima Koregaon Matter ) आयोगापुढे पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला ( Rashmi Shukla ) यांची साक्ष आज (दि. 16) मुंबईत सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये नोंदवण्यात येणार होती. मात्र, रश्मी शुक्ला यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने शुक्ला यांची साक्ष नोंदवण्यात आली नाही. पुन्हा रश्मी शुक्ला यांची साक्ष कधी नोंदवण्यात येथे यासंदर्भात तारीख कळू शकली नाही.

रश्मी शुक्ला
रश्मी शुक्ला

By

Published : Dec 16, 2021, 8:39 PM IST

मुंबई -भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी ( Bhima koregaon Matter ) आयोगापुढे पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला ( Rashmi Shukla ) यांची साक्ष आज (दि. 16) मुंबईत सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये नोंदवण्यात येणार होती. मात्र, रश्मी शुक्ला यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने शुक्ला यांची साक्ष नोंदवण्यात आली नाही. पुन्हा रश्मी शुक्ला यांची साक्ष कधी नोंदवण्यात येथे यासंदर्भात तारीख कळू शकली नाही.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या न्यायमूर्ती जे. एन. पटेल आयोगासमोर या प्रकरणाचा तपासात साक्षीदार म्हणून उपस्थित राहण्याचे निर्देश रश्मी शुक्ला यांना आयोगाने दिले आहेत. मात्र आज आयोगाची सुनवाणी झाली नाही.

काय आहे प्रकरण..?

पुण्यात 31 डिसेंबर, 2017 मध्ये पार पडलेल्या एल्गार परिषदेनंतर 1 जानेवारी, 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार घडला होता. या हिंसाचारामध्ये एकाचा मृत्यू झाला होता तर अनेकजण जखमी झाले होते. या हिसांचाराच्या चौकशीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या काळात मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जे .एन .पटेल यांच्या अध्यक्षतेखाली दोन सदस्यांच्या समावेश असलेल्या आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.

नेमकी कशी झाली होती हिंसा ..?

1 जानेवारी, 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश सैनिकांदरम्यान झालेल्या युद्धाला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 1 जानेवारी, 2018 रोजी कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाजवळ विजय दिवस साजरा करण्यासाठी काही हे नागरिक जमले होते. यावेळी काही समाज कंटकांकडून या कार्यक्रमाला गालबोट लागले आणि काही हिंसक घटना घडल्या होत्या.

पुण्याजवळच्या कोरेगाव भीमा, पाबळ आणि शिक्रापूर येथून हिंसक घटनांना सुरुवात झाली. या गावांमध्ये झालेल्या दगडफेकीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला होता. घटनेच्या दुसऱ्या दिवशी राज्यभर या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली.

हे ही वाचा -Etv Bharat Special : निर्भया हत्याकांडानंतर राज्यात महिला अत्याचाराविरोधात कठोर नियम; मात्र अत्याचार सुरूच

ABOUT THE AUTHOR

...view details