मुंबई -संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर या अधिवेशनातून काय मिळाले, यावर चर्चा सुरू झाली आहे. पूर्ण अधिवेशनकाळ विरोधी पक्षांचे १२ निलंबित खासदार महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ बसून आंदोलन करत राहिले. तर संसदेमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून खडाजंगी होत राहिली. (12 Opposition MPs suspended) या पार्श्वभूमीवर जया बच्चन यांनी सरकारला राज्यसभेतच शाप दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून मोदी सरकारवर परखड शब्दांत निशाणा साधला आहे. सामनामधील रोखठोक सदरातून राऊतांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
...तेव्हा संसदही क्षणभर थरथरली असेल'
राऊतांनी जया बच्चन (Jaya Bachchan lashed BJP in parliament) यांच्या त्या विधानावरून केंद्रावर निशाणा साधला आहे. 'लोकशाहीत विरोधकांच्या वर्तनावर नेहमी बोट दाखवले जाते. पण सत्ताधाऱ्यांचे वर्तन हे कितीही बेकायदेशीर असले, तरी त्यांच्याकडे कुणी बोट दाखवत नाही. जया बच्चन संतापाने थरथरत उभ्या राहिला आणि म्हणाल्या 'मी तुम्हाला शाप देते, तुमचे बुरे दिन लवकरच सुरू होत आहेत. आमचा गळाच एकदाचा (Jaya Bachchan in parliament ) घोटून टाका, लोकशाही खतम करा’, असे त्या म्हणाल्या. तेव्हा संसदेची ती ऐतिहासिक इमारतही क्षणभर थरथरली असेल. विरोधी पक्षाचा एवढा अपमान यापूर्वी कधी धाला नसेल', असही राऊत म्हणाले आहेत.
तुम्ही कुत्र्यांचा यात अपमान करत आहात
केंद्र सरकार विरोधकांना कुत्र्यांसारखी वागणूक देत असल्याचे संजय राऊत म्हणतात. 'जुन्या मातोश्री निवासस्थानी बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत एक पाटी होती. (Sharad Pawar On Central Government ) त्यावर लिहिलेलं 'जो जो मी निर्वाचित जनप्रतिनिधींचे चाळे पाहतो, तो तो मला माझ्या कुत्र्याची जास्तच प्रशंसा करावीशी वाटते-लामरटीन’. यावर बाळासाहेब ठाकरे चिरुटाचा धूर सोडत म्हणत, तुम्ही कुत्र्यांचा यात अपमान करत आहात. माणसांपेक्षा ते एकनिष्ठ असतात. (Sharad Pawar Criticism of BJP) आज दिल्लीच्या राजकारणात स्वत:ला देव म्हणवून घेणारे वावरत आहेत. ते विरोधकांना कुत्र्यांसारखे वागवीत आहेत”, असं संजय राऊतांनी यात म्हटलं आहे.