मुंबई- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ होत असतानाच, आता त्यांचे पाय आणखीन खोलात जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून परमबीर यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे. भारतीय सेवा नियम आणि कायदा या अंतर्गत ही चौकशी करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असल्याचेही राज्य सरकारने न्यायालयात म्हटले आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांच्या विरोधात पाच ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये खंडणीचा गुन्ह्याची नोंद आहे. या प्रकरणी राज्य सरकार आणि परमबीर यांची उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यावेळी राज्य सरकारने कायद्यापेक्षा कुणीही मोठा नसल्याचे सांगत परमबीर यांच्या चौकशीची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असल्याचे स्पष्ट केले. एकापाठोपाठ एक तक्रारी दाखल होत असताना परमबीर सिंह यांनी स्वत:ला कायद्यापेक्षा मोठ समजू नये, असा युक्तीवाद राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला आहे.
परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांची वसुली करायला सांगितल्याचा आरोप करत लेटर बॉम्ब फोडला होता. मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी झालेल्या परमबीर सिंह यांची सचिन वाझे प्रकरणातही चौकशी सुरू आहे. दरम्यान मुंबई पोलिसांकडून संजय पांडे या अधिकाऱ्या नेतृत्वात परमबीर यांची चौकशी सुरू करण्यात येणार होती. मात्र, त्यांनी परमबीर यांची चौकशी करण्यास नकार दिला होता. त्यानंतर नव्या अधिका-यांची नियुक्त करून परमबीर यांच्याविरोधात नव्यानं चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीला वारंवार नोटीस बजावूनही परमबीर सिंह एकदाही हजर झालेले नाहीत. भारतीय सेवा नियम आणि कायदा अंतर्गतही राज्य सरकारनं परमबीर यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असल्याचे सांगण्यात आले आहे.
परमबीर सिंग यांच्याविरोधात यापूर्वीचे दाखल गुन्हे-