ठाणे -मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी ठाणे पोलीस आयुक्तांनी एसआयटीची (SIT) स्थापना केली. डीसीपी दर्जाचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करणार आहेत. परमबीर सिंग आपले म्हणणे मांडण्यासाठी ठाणे पोलीस ठाण्यात (Param Bir Singh landed in Mumbai) दाखल झाले आहेत.
मुंबईतील व्यावसायिक केतन तन्ना, सोनु जलान आणि रियाज भाटी या तिघांनी 30 जुलै रोजी परमबीर सिंग यांच्यासह 29 जणांविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात खंडणी आणि खोट्या गुन्ह्यात अडकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ठाणे न्यायालयाने परमबीर यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढले होते. ठाणे पोलीस परमबीर यांच्या मुंबई आणि चंदीगड येथील घरी जाऊन आले होते. मात्र, ते घरी नसल्याने त्यांच्या घरावर ठाणे पोलिसांनी वॉरंटची प्रत लावली होती.
ठाण्यात परमबीर सिंगचे आदरातिथ्य
परमबीर सिंग ठाणे नगर पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर पोलीस स्टेशन बाहेरील प्रसिद्ध हॉटेलमधून 3 ग्रीन टी आणि 3 नॉर्मल चहा पोलीस स्टेशन मागवण्यात आल्या होत्या. परमबीर सिंग यांनी ग्रीन टी घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.
चौकशीसाठी हजर...