ठाणे :गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेवर गुन्हे दाखल करण्यात येत असून काही कारण नसताना निष्ठावंत शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करून अडकविण्याचे काम सध्या सुरू आहे. याबाबत ठाणे जिल्हा शिवसेना शाखेच्या वतीने ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेऊन पत्राद्वारे न्यायासाठी निवेदन देण्यात ( Thane Police Commissioner Jaijit Singh for justice )आले आहे. शिवीगाळ केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला असताना ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या शाखेबाहेर तलवारी नाचवत शक्तिप्रदर्शन ( Sword dancing power show ) केल्याचा आरोपही उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray group ) गटाकडून करण्यात आला आहे यावर पोलिसांनी कोणत्या प्रकारे गुन्हा दाखल केलेला नाही आणि म्हणूनच पोलीस देखील दबावात काम करत असल्याचा आरोप उद्धव गटाकडून होत आहे.
तलवारींसह जल्लोष केल्याचा आरोप - काल मुख्यमंत्र्यांच्या शाखेवर मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला शिंदे गटाने हा जल्लोष करत असताना ढाल तलवारी ही आणल्या होत्या आणि याच ढाल तलवारी नाचवल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल उद्धव ठाकरे गटाकडून विचारत उद्धव ठाकरे यांच्या गटातील पदाधिकाऱ्यांवर शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा म्हणजे पोलीस बळाचा गैरवापर असल्याचे उद्धव ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे
दोन्ही गटांच्या भांडणाची पार्श्वभूमी - १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री म्हणजे १५ ऑगस्ट च्या प्रारंभी तलावपाली येथील मध्यवर्ती शाखेमध्ये ध्वजारोहणाचा सोहळा गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या परंपरेनुसार यावर्षीही असंख्य निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी पोहोचविले असताना फुटीर गटाकडून चितावणी होत असताना सुद्धा आम्ही संयम दाखवल्यामुळे आणि कायदा सुव्यवस्थेची जाण ठेवून संघर्ष टाळला. त्यानंतर मनोरमा नगर येथे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या वाचनालयाचे नामफलक काढून शिंदे गटाचा नामफलक लावला जबरदस्तीने वाचनालयाची जागा बळकवण्याचा प्रयत्न केला तेथेही आम्ही संयम सोडला नाही.तसेच ५ ऑक्टोंबर शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यास पक्षाचा जय जयकार करत घोषणा देत शिस्तीने ठाणे रेल्वे स्थानकात जात असताना ७७ वर्षाचे निवृत्त शासकीय अधिकारी शंकर गणपत शिंदे त्यांच्यासह १३ ते १४ जणांवर गुन्हा दाखल करून दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांनाच आज दि.१३ ऑक्टोबर रोजी भल्या सकाळी चाप्टर केस भरल्याच्या नोटीसा देण्यात आल्या. चेंदणी कोळीवाडा या भागातील गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असणारी शिवसेनेची शाखा शिंदे गटाकडून दुरुस्ती च्या नावाखाली बळकविण्याचा प्रयत्न करीत असताना सुद्धा अत्यंत संयमाने ही परिस्थिती हाताळून घेतली.