मुंबई - कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणाबाबत चिंता वाढविणारी महत्त्वाची बातमी आहे. धारावी परिसरात शाळेच्या ऑनलाईन शिकवणी वर्गामध्ये अज्ञाताने घुसखोरी करत अश्लील व्हिडीओ सुरू केला. शिकवणी वर्ग सुरू असताना या स्वरुपाचे व्हिडीओ सुरू झाल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांना धक्का बसला. याप्रकरणी शाहू नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार धारावी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ऑनलाइन पद्धतीने शिकवणी वर्ग सुरू होते. ऑनलाइन पद्धतीने शिक्षक शिकवत असताना अज्ञात तरुणाने बनावट नावाने संबंधित क्लासमध्ये घुसखोरी करत अश्लील व्हिडीओ सुरू करत होता. हा प्रकार तब्बल अकरा दिवस सुरू होता. या प्रकरणी शाळेच्या प्राचार्यांनी शाहू नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली होती.
हेही वाचा-शांती नगर पोलिसांनी शंभर मोबाईलचा शोध घेत केले मूळ मालकांना परत
आरोपीवर गुन्हा दाखल-
पोलिसांनी या अज्ञात आरोपीविरोधात विनयभंग, पोक्सो आणि माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा आरोपी एका मुलीला संबोधून अश्लील व्हिडीओ पाठवित होता. ऑनलाईन वर्गाची लिंक एका विद्यार्थानेच अज्ञात आरोपींना पाठवल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. आरोपींना क्लासची लिंक कुठून मिळाली ? याचा पोलीस तपास करत आहेत.
हेही वाचा-एटीएम बसवण्याच्या अमिषातून ८ कोटींची फसवणूक; ८० जणांना घातला गंडा
पालकांनो लक्ष द्या -
कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षांपासून सर्वच शाळा व महाविद्यालयात विद्यार्थाचे ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरू केले आहे. शिक्षकांनी ऑनलाइन लेक्चर्स, वर्कशिट्स व व्हिडिओच्या माध्यमांतून शिकविण्यास सुरुवात केली. त्यामुळे देशातील 73 टक्के मुले आजघडीला शिक्षणासाठी मोबाईलचा वापर करतात. एकेकाळी विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवणाऱ्या पालकांनीच विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल दिले आहेत. विद्यार्थी मोबाईलच्या माध्यमातून शिक्षण घेण्याऐवजी इतर गोष्टींकडे अधिक लक्ष देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पालक वर्गसुद्धा चिंतेत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन वर्गात अश्लील प्रकार सुद्धा घडल्याचा घटना घडल्या आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांकडे लक्ष देण्याची गरज शिक्षक व्यक्त करत आहेत.
हेही वाचा-धक्कादायक! पत्नीसह दोन वर्षाच्या चिमुकलीची धारदार शस्त्राने हत्या करुन पतीची आत्महत्या