मुंबई -राज्य विधिमंडळाचे लांबलेले पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन १७ ऑगस्टपासून २५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. तर, दुसरीकडे आज संध्याकाळी पाच वाजता Tea party of shinde bjp government राज्य सरकारने सह्याद्री अतिथीगृहावर चहापान आणि त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीचे Shinde government आयोजन केले आहे. त्यामुळे आज राजकीय घडामोडी Maharashtra assembly monsoon session वाढण्याची शक्यता आहे.
Maharashtra assembly monsoon session सत्ताधाऱ्यांची उद्या कसोटी आज चहापान कार्यक्रम - shinde government
आज संध्याकाळी पाच वाजता Tea party of shinde bjp government राज्य सरकारने सह्याद्री अतिथीगृहावर चहापान आणि त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीचे Shinde government आयोजन केले आहे. त्यामुळे आज राजकीय घडामोडी Maharashtra assembly monsoon session वाढण्याची शक्यता आहे.
शिंदे सरकारची कसोटीअर्थसंकल्पीय अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी पावसाळी अधिवेशन १८ जुलै रोजी होईल, असे घोषित केले होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. सरकारचा शपथविधी, लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपामुळे पावसाळी अधिवेशनाला मुहूर्त मिळत नव्हता. अखेर, १५ ऑगस्टपूर्वी राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. नुकतेच पदभार स्वीकारलेल्या मंत्र्यांना विरोधक अडचणीत आणण्याची एकही संधी सोडणार नाही. अशातच बंडखोरी केलेले आमदार मंत्री असल्याने उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात शिंदे सरकारची कसोटी लागणार आहे.
१७ ऑगस्टपासूनअधिवेशनासाठी विधानसभा कामकाज सल्लागार समितीवरील सदस्यांची नामनियुक्त यादी जाहीर करण्यात आली. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या यापूर्वी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. १७ ते २५ ऑगस्टपर्यंत अधिवेशन होणार असले तरी १९ ऑगस्ट रोजी दहीहंडीची सुट्टी आणि २० आणि २१ ला सार्वजनिक सुट्या आहेत. सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्याने अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाज हे सहा दिवसांचे असणार आहे. २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
हेही वाचाBilkis Bano case बिल्कीस बानो अत्याचार प्रकरणातील 11 दोषींची सुटका