मुंबईमुंबई मॅरेथॉनमध्ये सर्वच धावतात. आम्ही सुद्धा धावलो. सुरत व्हाया गुवाहाटी, गोवा मार्गे मुंबई. आमची मॅरेथॉन अवघड होती. पण, आम्ही पार केली आणि जिंकलो. तुम्हाला पदक मिळते. आम्हाला पहिले येऊन सुध्दा पदक मिळत नाही. सुमारे ३० वर्ष धावल्यानंतर मुख्यमंत्री झालो, अशी तुफान फटकेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी केली. यावेळी राजकीय मुख्यमंत्र्यांच्या जोरदार फटकेबाजीमुळे हास्याचे चांगलेच फवारे उडाले.
३० वर्षे धावल्यावर मुख्यमंत्री बनलोमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या हस्ते टाटा मुंबई मॅरेथॉन २०२३ उद्घाटन ( Tata Mumbai Marathon 2023 ) झाले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. आम्ही एक मोठी शर्यत जिंकून आलो आहे. मुंबई व्हाया सुरत व्हाया गुवाहाटी. आमची मॅरेथॉन अवघड होती. पण आम्ही मॅरेथॉन पार केली आणि जिंकलो. आमचे चहल पळत असतात, यंदा आम्हालाही पाळावे लागले. आत मॅरेथॉन वाले पाळतात, पण आम्हीही पळतो आणि पळवतोही. मात्र भूमिका बजवावी लागते. पण तुम्हाला पदक मिळते आम्हाला पहिले येऊन पदक मिळत नाही. कधी मागे राहिलो तर मिळतोही, अशी मिस्कील विधान करत सभागृहात करत हास्य पिकवले. तसेच आमच्या बद्दल सगळ्यांना वाटत होतं, काय होईल जेव्हा आम्ही तीकडे गेलो होतो. लढाई अवघड होती. ३० वर्षाच्या धावल्यानंतर मुख्यमंत्री बनलोय आहे. मुख्यमंत्री झाल्यावर कळत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
उद्योजक टाटा सरकार सोबतमुंबई मॅरेथॉनची वाट जगातील सगळे लोक पाहत असतात. मागील दोन वर्षात कोव्हिडमुळे मॅरेथॉनचे आयोजन करता आले नाही. यंदा जगातील सगळ्यात मोठी मॅरेथॉन यंदा होत आहे. जगातील सगळ्यात मोठी मॅरेथॉन आहे. ही देखील आमची मोठी कामगिरी आहे. काही दिवसांपूर्वी उद्योजक रतन टाटा ( Entrepreneur Ratan Tata ) यांना भेटलो, ते सरकारसोबत हातात हात घेऊन राज्य पुढे नेऊ म्हणाले. त्यांचे योगदान टाटा मुंबई मॅरथॉनमध्ये खूप मोठे आहे. या मॅरेथॉनसाठी जगभरातील इच्छुकांसाठी नोंदणी आज सुरू होते आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.