महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Task Force Committee : कोरोना वाढतोय.. पंतप्रधानांची आज बैठक, टास्क फोर्सचा मास्क सक्तीचा प्रस्ताव - टास्क फोर्स प्रस्ताव महाराष्ट्र सरकार

कोरोनाची तिसरी लाट ओसरून जनजीवन पूर्वपदावर आले. राज्य सरकारने ( Task Force Committee on mask ) मास्क सक्ती हटवली. जून दरम्यान चौथ्या लाटेचा सौम्य धोका वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अलर्ट राहून मास्क अनिवार्य करावे, असा प्रस्ताव टास्क फोर्स ( Task Force Committee proposal on mask ) समितीने मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील वाढत्या कोविड रुग्णसंख्येबाबत ( PM Modi meeting with cm on mask ) देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहे.

mask
मास्क

By

Published : Apr 27, 2022, 9:11 AM IST

Updated : Apr 27, 2022, 11:32 AM IST

मुंबई - कोरोनाची तिसरी लाट ओसरून जनजीवन पूर्वपदावर आले. राज्य सरकारने ( Task Force Committee on mask ) मास्क सक्ती हटवली. जून दरम्यान चौथ्या लाटेचा सौम्य धोका वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अलर्ट राहून मास्क अनिवार्य करावे, असा प्रस्ताव टास्क फोर्स ( Task Force Committee proposal on mask) समितीने मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा राज्यातील ( Task Force Committee news Mumbai ) नागरिकांचा मोकळा श्वास बंद होण्याची शक्यता आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील वाढत्या कोविड रुग्णसंख्येबाबत देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत ( PM Modi meeting with cm on mask ) बैठक घेणार आहे.

हेही वाचा -Phone Taping Case : रश्मी शुक्ला यांच्याविरोधात 700 पानांचे आरोपपत्र दाखल

दिल्ली कर्नाटक आणि इतर राज्यांत कोरोनाने डोके वर काढले आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने राज्य टास्क फोर्स समितीची नुकतीच बैठक पार पडली. बैठकीत सरकारने उठवलेली मास्क बंदी पुन्हा अनिवार्य करावी, लसीकरणाचा वेग वाढवणे, जिनोम सिक्वेन्सिंगवर भर देणे आणि रुग्णांचा शोध घेणे आवश्यक आहे. विशेषत: मॉल्स, चित्रपटगृह, नाट्यगृह आदी बंदिस्त ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करावे, अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या. विमान कंपन्यांप्रमाणे सरकारी आणि खासगी रुग्णालये, विविध प्राधिकरण, कार्यालयात मास्क घालण्याचे आवाहन करण्यात यावे, असे मत समितीतील सदस्यांनी बैठकीत मांडले आहे. या संदर्भातील प्रस्ताव टास्क फोर्स समितीने तयार करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे.

या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा -राज्यात चाचण्या कमी होत आहेत. त्या वाढवण्यावर भर द्यावा. ज्यांना संसर्ग झालेला आहे त्यांना रॅपिड टेस्ट करून क्वारंटाईन करावे. लांबचा प्रवास करणाऱ्यांना आरटीपीसीआर टेस्ट करण्यास भाग पाडावे. दोन लसींनंतरच्या बूस्टर डोसचे अंतर २७० वरून १८० दिवस इतके कमी करावे. जिनोम सिक्वेन्सिंगच्या रिपोर्टसाठी प्रयोगशाळा वाढवायला हव्यात, या प्रमुख मुद्द्यांवर टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक -कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दुपारी १२ वाजता सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( PM Modi meeting with CM Uddhav Thackeray news ) देखील उपस्थित राहणार आहेत. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या दरम्यान केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण हे कोविड -19 च्या स्थितीवर प्रेझेंटेशनही देतील.

देशातील कोविड रुग्णसंख्या -मंगळवारी देशात एकाच दिवसात कोविड-19 चे 2 हजार 483 नवीन रुग्ण आढळले. यासह, देशात आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झालेल्या एकूण लोकांची संख्या 4 कोटी 30 लाख 62 हजार 569 इतकी झाली आहे. त्याचवेळी, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 15 हजार 636 वर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी 8 वाजता जारी केलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात संसर्गामुळे मृत्यूची 1 हजार 399 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. देशातील संसर्गामुळे मृत्यूची एकूण संख्या 5 लाख 23 हजार 622 इतकी झाली आहे.

हेही वाचा -Today Petrol- Diesel Rates : पेट्रोल-डिझेल दरात वाढ; वाचा आजचे नवे भाव

Last Updated : Apr 27, 2022, 11:32 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details