मुंबई -आंबेडकर चळवळीतीस प्रसिद्ध वक्त्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांनी शिनसेनेत ( Sushma Andhare joins Shinsena ) प्रवेश केला आहे. याबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ( Party chief Uddhav Thackeray ) म्हणाले की, सुषमाताईसह त्यांचे सैनिक युद्ध सुरू असताना शिवसेनेत आलेत. मुद्दाम उल्लेख करतो, नीलमताई या देखील कडवट हिंदुत्ववादी नव्हत्या, तरी देखील त्या शिवसेनेत आल्या. पण आता बघा कोण पुरोगामी, कोण प्रतिगामी? याचा विचार तुम्ही करा असे उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे बोलतांना ठाकरे म्हणाले की, आम्ही 3 तास बोलत होतो, विविध विषयांवर बोललो, मला भूक लागली म्हणून मी म्हणालो नंतर भेटू, त्यांचा दुसऱ्या दिवशी फोन आला की मला शिवसेनामध्ये यायचे आहे.
ज्यांना शिवसेनेने सामान्यांचे असामान्य केले ते निघून गेले. मात्र, पुन्हा सामान्य सैनिकांना असामान्य करण्याची वेळ आली आहे अशी टीका त्यांनी शिंदे गटावर नाव न घेता केली. पुढे ठाकरे म्हणाले की, ठीक आहे, अशा गोष्टी होत असतात. दिवसवर खाली होत असतात, पण एका गोष्टीचे कौतुक वाटते की, सुषमाताई आज शिवसेनेत आल्या. शिवसेनेच्या दोन लढाया सुरू आहेत. एक सुप्रीम कोर्टात आहे, त्याबद्दल मला बोलायचे नाही असे म्हणत त्यांनी शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी नव्याने बांधणी करावी लागणार असल्याचे म्हणटले आहे.
कोण आहेत सुषमा अंधारे - सुषमा अंधारे यांचा जन्म कळंब तालुक्यातील पाडोळी जिल्हा उस्मानाबाद येथे झाला आहे. सुषमा अंधारे यांच्या वडिलाचे नाव दत्ताराव गूत्ते असे आहे. त्या वडिलांच्या नावाऐवजी आईच्या वडिलांचे नाव लावतात. सुषमा अंधारे यांचे वडील दत्ताराव गूत्त्ते हे वंजारी असून, आई कोल्हाटी समाजातील आहेत. आईशी लग्न करण्यापूर्वी त्यांची २ लग्ने झाली होती. पण मूल नसल्याने त्यांनी तिसरे लग्न केले. सुषमा यांचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांमध्ये वाद होवू लागले होते. तेव्हा आजोबांनी सुषमाला आपल्याकडे ठेवून घेतले. त्यांनी सुषमाची सर्व जबाबदारी सांभाळली. शाळेत प्रवेश घेताना पालक म्हणून आजोबांनी त्यांचे नाव सांगितले. त्यामुळे त्यांचे नाव सुषमा दगडू अंधारे असे, नाव कागदोपत्री नोंदले गेले.
बौद्धधर्माची दीक्षा -सुषमा अंधारे या एम.ए., बी.एड. आहेत. त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी, राजस्थानी खडीबोलीसहित भटक्या विमुक्तांच्या बोलीभाषा अवगत आहेत. महात्मा फुले-शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारांचा प्रभाव त्यांच्यावर आहे. अंधारे यांनी २ ऑक्टोबर २००६ रोजी भदंत नागार्जुन सुरई यांचेकडून भटक्या विमुक्तातील प्रातिनिधिक ४२ जातींच्या लोकांसह ’उपरा’कार लक्ष्मण माने, एकनाथ आवाड यांच्यासह बौद्धधर्माची दीक्षा घेतली आहे.