मुंबई- सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास केला जात आहे. सुशांतसिंहचे वडील केके सिंह यांनी बिहार पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर बिहार पोलिसांचे एक पथक मुंबईत तपासासाठी दाखल झाले आहे. दरम्यान, सुशांतसिंहच्या व़डिलांनी कुठलीही लेखी तक्रार केली नसल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सुशांतसिंहच्या वडिलांनी कुठलीही लेखी तक्रार केली नाही; मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण
मुंबई पोलिसांच्या विरोधात वेगवेगळ्या गोष्टींवरून टीका होत असताना, सुशांतसिंहच्या वडिलांनी नुकतेच जाहीर केलेल्या एका स्टेटमेंटवरून त्यांनी 25 फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिसांकडे सुशांतसिंह आत्महत्या संदर्भात तक्रार केली असल्याचे म्हटले आहे. मात्र, या गोष्टीचे खंडन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांच्या विरोधात वेगवेगळ्या गोष्टींवरून टीका होत असताना, सुशांतसिंहच्या वडिलांनी नुकतेच जाहीर केलेल्या एका स्टेटमेंटवरून त्यांनी 25 फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिसांकडे सुशांतसिंह आत्महत्या संदर्भात तक्रार केली असल्याचे म्हटले आहे. मात्र, या गोष्टीचे खंडन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका परिपत्रकानुसार सुशांतच्या वडिलांनी 25 फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिसांच्या बांद्रा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली असल्याचे म्हटले होते. मात्र, सुशांतच्या वडिलांनी बांद्रा पोलिसांकडे कुठलीही लेखी तक्रार केली नसल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सुशांतसिंह याचा मेव्हणा आयपीएस अधिकारी ओ पी सिंह यांनी मुंबई पोलिसांच्या जोन 9 च्या डीसीपींना सुशांतसिंहच्या संदर्भात काही व्हॉट्स अॅप मेसेज केले होते. मात्र, या संदर्भात स्वतः जोन 9 च्या डीसीपींनी ओ पी सिंह यांना संपर्क साधून या प्रकरणी स्वतः येऊन लेखी तक्रार केल्याशिवाय सुशांतसंदर्भात कुठलीही कारवाई करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, हे प्रकरण अनौपचारिक पद्धतीने सोडवण्यात यावे असे ओ पी सिंह यांचे म्हणणे होते, ज्यास मुंबई पोलिसांच्या जोन 9 च्या डीसीपींनी स्पष्ट नकार दिला होता.