मुंबई- बॉलिवूडमधील असिस्टंट डायरेक्टर ऋषिकेश पवारला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अटक करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ऋषिकेश पवार हा फरार होता. त्याच्या शोधात एनसीबीनचे पथक काम करत होते.
ऋषिकेश पवार हा अचानक झाला होता गायब-
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर या संदर्भात बॉलिवूडमधल्या नामवंत अभिनेत्री, अभिनेते यांची चौकशी करण्यात आली होती. या बरोबरच सुशांतसिंहच्या जवळच्या मित्रांची, नातेवाईकांची चौकशी करण्यात आल्यानंतर मुंबई शहरातील अधिक अमली पदार्थ तस्करांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. यादरम्यान अमली पदार्थ तस्करांकडून ऋषिकेश पवार याच नाव समोर आलं होत. त्यानंतर ऋषिकेश पवार हा अचानक गायब झालेला होता.