महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याचा मी निषेध करते - सुरेखा पुणेकर - सुरेखा पुणेकर

प्रवीण दरेकर यांना महिलांचा आदर करता येत नसेल तर किमान अनादर तरी करू नये, असा इशारा सुरेखा पुणेकर यांनी दिला. त्यांनी आज (गुरुवारी) मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी गायिका देवयानी बेंद्रे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

सुरेखा पुणेकर
सुरेखा पुणेकर

By

Published : Sep 16, 2021, 6:21 PM IST

Updated : Sep 16, 2021, 6:59 PM IST

मुंबई -विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याचा मी निषेध करते. प्रवीण दरेकर यांना महिलांचा आदर करता येत नसेल तर किमान अनादर तरी करू नये, असा इशारा सुरेखा पुणेकर यांनी दिला. त्यांनी आज (गुरुवारी) मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी गायिका देवयानी बेंद्रे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

सुरेखा पुणेकर प्रतिक्रिया देतांना
महाराष्ट्राच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी कलेची जपणूक करण्याची ही परंपरा‌ सुरु ठेवली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये‌ जसे सर्व जाती-धर्मातील लोक आहेत. त्याप्रमाणेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा देखील सहभाग असला पाहिजे, ही शरद पवार यांची भूमिका आहे. पुढील काळात जिल्हा परिषद, सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी अजित पवार यांनी केले.
Last Updated : Sep 16, 2021, 6:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details