महाराष्ट्र

maharashtra

मुंबईला दीड लाख लसींचा पुरवठा; तीन दिवस लसीकरण सुरू राहणार

By

Published : Apr 25, 2021, 9:18 PM IST

मुंबईत गेले तीन महिने लसीकरण सुरू आहे. पालिका, सरकारी अशी 59 लसीकरण केंद्रे तर खासगी रुग्णालयात 73 अशी एकूण 132 लसीकरण केंद्रांवर लसीकरण केले जाते. आतापर्यंत 22 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मुंबईत दिवसाला 30 ते 50 हजार लसीकरण केले जात आहे.

लसीकरण
लसीकरण

मुंबई - मुंबईत कोरोना लसीकरण मोठ्या संख्येने होत आहे. यामुळे लसीचा वारंवार तुटवडा जाणवत आहे. आजही (रविवार) 132 पैकी फक्त 37 लसीकरण केंद्र सुरू होती. मात्र आज 1 लाख 58 हजार लसीचा साठा आल्याने आता उद्या सोमवार ते बुधवार असे किमान तीन दिवस मुंबईतील लसीकरण सुरळीत होण्यास मदत होणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

लसीचा तुटवडा -

मुंबईत कोरोनाचा प्रसार गेले वर्षभर आहे. हा प्रसार रोखण्यासाठी मुंबईत गेले तीन महिने लसीकरण सुरू आहे. पालिका, सरकारी अशी 59 लसीकरण केंद्रे तर खासगी रुग्णालयात 73 अशी एकूण 132 लसीकरण केंद्रांवर लसीकरण केले जाते. आतापर्यंत 22 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मुंबईत दिवसाला 30 ते 50 हजार लसीकरण केले जात आहे. त्या प्रमाणात लसीचा साठा कमी मिळत असल्याने लसीचा तुटवडा जाणवत असल्याने अडचणी येत आहेत. लसीचा साठा मर्यादित स्वरुपात प्राप्त होत असल्याने अधूनमधून काही केंद्रांवर लसीकरण तात्पुरते थांबवावे लागते. त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देणे क्रमप्राप्त असल्याने लसींचा प्राप्त होणारा साठा लक्षात घेवून दररोज लसीकरण मोहिमेचे नियोजन केले जात आहे.

तीन दिवस लसीकरण सुरू राहणार -

महापालिकेला आज कोविशिल्ड लसीच्या 1 लाख 50 हजार तर कोव्हॅक्सिन लसीच्या 8 हजार अश्या एकूण 1 लाख 58 हजार लसी प्राप्त झाल्या आहेत. हा साठा महानगरपालिकेच्या कांजूरमार्ग येथील प्रादेशिक लस साठवण केंद्रात नेण्यात आला आहे. मुंबईतील महानगरपालिका, शासकीय आणि खासगी अशा सर्व लसीकरण केंद्रांना कांजूरमार्ग येथूनच, त्यांची सरासरी दैनंदिन आवश्यकता लक्षात घेऊन लस साठा वितरण सुरू करण्यात आले आहे. लसीचा साठा आल्याने उद्या सोमवार पासून बुधवार पर्यंत लसीकरण करता येणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details