महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 10, 2021, 5:07 PM IST

ETV Bharat / city

Mumbai Railway - तिन्ही रेल्वे मार्गांवर ११ जुलैला मेगाब्लॉक, रेल्वे प्रवाशांची होणार अडचण

उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर रविवारी ११ जुलै २०२१ रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे-कल्याण अॅप व डाउन धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. तर, पश्चिम रेल्वे मार्गांवर माहीम ते अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर रविवारी ११ जुलै २०२१ रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत.
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर रविवारी ११ जुलै २०२१ रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत.

मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर रविवारी ११ जुलै २०२१ रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे-कल्याण अॅप व डाउन धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. तर, पश्चिम रेल्वे मार्गांवर माहीम ते अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान अप व डाउन धीम्या मार्गावर सकाळी ११. ०० ते संध्याकाळी ४. ०० दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान मुलुंड येथून सकाळी १०. ४३ मिनिट ते दुपारी ३.४६ दरम्यान सुटणाऱ्या सेवा मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविली जाईल. तसेच, ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबून नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल. सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५१ दरम्यान कल्याण येथून सुटणारी अप धिम्या/अर्धजलद सेवा कल्याण व मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. तसेच, डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकांवर थांबून पुढे मुलुंड स्टेशनवर अप धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येऊन नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.

हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक

हार्बर मार्गावरील सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप व डाउन मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान डाउन हार्बर मार्गावर सीएसएमटी मुंबई येथून सकाळी ११.३४ ते सायंकाळी ४.४७ या कालावधीत वाशी/बेलापूर/पनवेलकरीता सेवा व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.०२ ते सायंकाळी ४.४३ दरम्यान वांद्रे/गोरेगावकडे जाण्याऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. अप हार्बर मार्गावर पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० या वेळेत सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.१० ते सायंकाळी ४.५८ दरम्यान अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गवरुन प्रवास करण्याची परवानगी आहे. पश्चिम रेल्वेवर

जम्बोब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम ते अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान धीम्या मार्गवर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यत जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान रेल्वे रूळ, सिंग्णल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यासह विविध देखभाल दुरुस्तीची काम केली जाणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगतले की, या ब्लॉकदरम्यान, मध्य रेल्वेकडे जाणाऱ्या सर्व गोरेगाव लोकल सेवा बंद असणार आहेत. तसेच, चर्चगेट ते गोरेगाव दरम्याच्या काही लोकल सेवा रद्द असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details