मुंबई - रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना आज विधिमंडळाच्या हक्कभंग समिती समोर हजर राहावे लागणार आहे. विधिमंडळात हजर राहण्यासाठी समितीने त्यांना पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक आणि जामिनावर सुटका झाली आहे.
हक्कभंग प्रकरण : अर्णब गोस्वामींना आज विधीमंडळात हजर राहावे लागणार - action against Arnab Goswami
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी गोस्वामी यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात आला होता. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभेत अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला होता.

या प्रकरणी अर्णब यांना यापूर्वीही नोटीस बजावली होती. मात्र, अर्णब गोस्वामी हजर न राहिल्याने आता आणखी एकदा समन्स बजावण्यात आले आहे. त्यानुसार अर्णब यांना आज विधिमंडळात हजर राहावे लागणार आहे.