अमरावती -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar Amravati tour ) हे आज (रविवारी) अमरावती दौऱ्यावर आहेत. अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात ( Dr. Punjabrao Deshmukh Medical College ) शरद पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण ( Statue of Chhatrapati Shivaji Maharaj ) व सभागृहाचे लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर ( Women and Child Welfare Minister Yashomati Thakur ) सह नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री पदाबाबद मोठे वक्तव्य केले आहे. छोटा मुह बडी बात म्हणत शरद पवार साहेब आपण जर मुख्यमंत्री असता तर महाराष्ट्राचे चित्र जरा वेगळे असते, असे वक्तव्य यशोमती ठाकुर यांनी केले आहे.
Yashomati Thakur Amravati : शरद पवार मुख्यमंत्री असते, तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते - यशोमती ठाकुर
शरद पवार आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळे असते, असे विधान महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर ( Women and Child Welfare Minister Yashomati Thakur ) यांनी केले आहे. अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात ( Dr. Punjabrao Deshmukh Medical College ) शरद पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण ( Statue of Chhatrapati Shivaji Maharaj ) व सभागृहाचे लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.
आजही शरद पवारांचीच गरज :यशोमती ठाकुर यांच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री पदाबाबत महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफूस असल्याची चर्चा रंगली आहे. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी साहेब यापूर्वी मुखमंत्री होते, असे म्हणताच आता सुद्धा शरद पवार यांचीची महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून गरज असल्याचे यशोमती ठाकूर म्हणाल्या. भर सभेत यशोमती ठाकुर यांनी मुख्यमंत्री पदाबाबद वक्तव्य केल्याने राजकिय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी सरकार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आहे, असेही यशोमती ठाकुर यांनी सांगितले.
हेही वाचा -Sharad Pawar In Amaravati : हिंदवी स्वराज्य सर्व जातींनी एकत्रित स्थापन केलेले राज्य - शरद पवार