मुंबई -यंदा १७ मार्च रोजी होलिकादहन आणि १८ मार्च रोजी धुलिवंदन ( state government New Rules For Dhulivandan ) आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने नवी नियमावली जाहीर केली ( New Rules For Holi ) आहे. मागील दोन वर्ष सतत करोनाचा प्रादुर्भाव असल्याने होळी व धुळवड जनतेला साजरी करता आली नव्हती. यंदा यातील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक करत नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
- होळी सणाच्या निमित्ताने नवी नियमावली -
जनतेला हे नियम पाळावेच लागणार आहेत अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदेश गृहमंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. कोरोना अजूनही पूर्णपणे संपलेला नसल्याने मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र, या होळी आणि धुळवड सणाच्या निमित्ताने गृहखात्याने नवी नियमावली जारी केली आहे.
- दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे धुलिवंदनाच्या उत्साहावर पाणी
देशभरात होळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. फाल्गुन पौर्णिमेला होलिकादहन करून दुसऱ्या वर्षी धुलिवंदन केले जाते. राज्यातही हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे धुलिवंदनाच्या उत्साहावर पाणी पडल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाचे निर्बंध कमी झाले असले तरी देखील होळी आणि धुलिवंदनासाठी राज्य सरकारने नवी नियमावली घोषित केली आहे.
- होळीनिमित्त राज्य सरकारचे नवे नियम -
राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्याने लाऊड स्पीकर जोरात लावू नये.
सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कायदा सुव्यवस्थेचे पालन करणे बंधनकारक असेल. रात्री १० च्या आत होळी करण्यात यावी.
होळीच्या सणानिमित्त वृक्षतोड करू नये. केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
होळी सणावेळी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणताही डीजे लावण्यास परवानगी नाही. जर कोणी डी.जेचा वापर करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.