मुंबई -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी मुंबईसह राज्यभरात लाॅकडाऊन लागू केला होता. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. या गाड्यांमुळे रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. प्रवाशांचा जादा वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे. त्यामुळे राज्यातील पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनेनी केली आहे. तसेच आता मध्य रेल्वेकडून मुंबई-नागपूर दुरातों एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. मात्र, उर्वरित रेल्वे पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.
सर्वसामान्य नागरिकांसाठी पॅसेंजर ट्रेन सुरू करा; प्रवाशांची मागणी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी मुंबईसह राज्यभरात लाॅकडाऊन लागू केला होता. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. या गाड्यांमुळे रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. प्रवाशांचा जादा वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे. त्यामुळे राज्यातील पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनेनी केली आहे.
प्रवासी संघटनेकडून पत्रव्यवहार -
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक हाल झाले आहे. तसेच सर्वसामान्य प्रवाशांना परवडणाऱ्या पॅसेंजर गाड्या अद्याप सुरू केल्या नाहीत. मुंबई-पुणे, मुंबई-नागपूर, मुंबई-नाशिक, यासह मुंबई आणि राज्यातील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद आहेत. त्यामुळे कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांचाच रेल्वे प्रवास होत आहे. तर, महाराष्ट्रातून जाणाऱ्या रेल्वेची प्रतीक्षा यादी भली मोठी आहे. परिणामी, गरजू प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच नोकरदार वर्ग, व्यवसायिक आर्थिक गर्तेत सापडले आहेत. त्यामुळे समाज माध्यमाद्वारे नागरिक ट्रेन सुरू करण्याची मागणी करत आहेत. तर, प्रवासी संघटनेकडून प्रशासनाला पत्रव्यवहार केला जात आहे.
मागणीनुसार ट्रेन सुरू होणार -
लोकल बंद, पॅसेंजर ट्रेन बंद, नियमित गाड्यांना विशेष एक्स्प्रेसने चालविणे यासर्व बाबींना प्रवासी वर्ग कंटाळला आहे. त्यामुळे प्रशासनाने बंद केलेल्या गाड्या सुरू करून नियमित एक्स्प्रेस सुरू करावे. पॅसेंजर एक्स्प्रेस बंद असल्याने राज्यातील विविध भागातून मुंबईत ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नोकरदार वर्ग, व्यावसायिक यांचे आर्थिक चक्र थांबले आहे. कोरोनाचे लसीचे दोन डोस घेतल्यासाठी उपनगरीय लोकल सुरू करण्यात यावी. प्रशासनाने तत्काळ रेल्वे सेवा सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे उपनगरीय प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, प्रवाशांच्या मागणीनुसार पॅसेंजर ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.