महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विशेष: राज्यात रेल्वे पोलीस मुद्देमालाच्या रिकव्हरीत अग्रेसर

राज्यात 'मुंबई रेल्वे पोलीस' एक मात्र असे पोलीस विभाग आहे. ज्यांनी जून 2020 ते सप्टेंबर 2020 या काळामध्ये 14 हजार 566 प्रकरणातील तब्बल 2 कोटी 13 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल पीडित प्रवाशांना परत केला आहे.

मुंबई रेल्वे पोलीस
मुंबई रेल्वे पोलीस

By

Published : Feb 6, 2021, 4:30 PM IST

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात 94 पोलीस ठाणे आहेत. या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दर दिवशी चोरी, दरोडा, फसवणूक सारखे गुन्हे घडत असतात. 2020 या वर्षामध्ये मुंबईत दरोड्याचे 15 गुन्हे घडले. यामध्ये 14 प्रकरणांमध्ये पोलिसांनी आरोपींना अटक करत मुद्देमाल हस्तगत केला आहे. रॉबरीचे तब्बल 535 गुन्हे घडले असून यामध्ये 161 गुन्ह्यांचा तपास करत पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच मुंबई शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये 2020 या वर्षामध्ये चोरीचे 3433 गुन्हे घडले आहेत. यामध्ये 1195 गुन्ह्यांचा तपास लावत पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला. वाहन चोरीचे 2801 गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये 1085 वाहन चोरीचे गुन्हे उघड करत पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे.

राज्यात रेल्वे पोलीस मुद्देमालाच्या रिकव्हरीत सर्वात पुढे
मुंबई शहरात चोरी झालेल्या मालाचा पोलिसांकडून तपास केला जातो. त्यामध्ये सर्वाधिक मुद्देमाल हस्तगत करून तो पीडित नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही पोलिसांची असते. मात्र हा प्रकार कायद्याच्या दृष्टिकोनातून खूपच क्लिष्ट असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई पोलीस खात्यातील ज्येष्ठ माजी पोलीस अधिकारी व अ‌ॅड धनराज वंजारी यांच्या म्हणण्यानुसार चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलिसांना मोठ्या प्रमाणात आपला कसं वापरुन चोरी झालेल्या मालाची रिकव्हरी करावी लागते. मात्र, रिकव्हरी केलेला मुद्देमाल हा त्याच्या मूळ मालकाला देण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेमधून पोलिसांना जावे लागते. यामध्ये वेळ जात असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
मुद्देमाल रिकव्हरीत रेल्वे पोलीस सर्वात पुढे-
राज्यात 'मुंबई रेल्वे पोलीस' एक मात्र असे पोलीस विभाग आहे. ज्यांनी जून 2020 ते सप्टेंबर 2020 या काळामध्ये 14 हजार 566 प्रकरणातील तब्बल 2 कोटी 13 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल पीडित प्रवाशांना परत केलेला आहे. यामध्ये 757 ग्राम चोरी करण्यात आलेले सोन्याचे दागिने, 6 लॅपटॉप, 1068 मोबाईल फोन हे जून 2020 ते सप्टेंबर 2020 या दरम्यान परत करण्यात आलेले आहेत. रेल्वे पोलिसांच्या या रिकव्हरी बद्दल विशेष बाब म्हणजे लॉकडाउन दरम्यान चोरी करण्यात आलेल्या मुद्देमालाची रिकव्हरी केल्यानंतर प्रत्यक्षात रेल्वे पोलिसांकडून सदरची वस्तू ही मूळ मालकाकडे स्वतः जाऊन त्यांना परत करण्यात आली आहे.

26 वर्षापुर्वी चोरी झालेला माल केला परत-

रेल्वे पोलिसांनी चोरी झालेल्या मालाचा तपास करत असताना बांद्रा रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तक्रारदार क्लाईव्ह डिसोझा यांची 26 वर्षापूर्वी 5 ग्राम सोन्याची साखळी चोरी झाली होती. मात्र 26 वर्षानंतरही या प्रकरणाचा छडा लावत 5 ग्रॅम सोन्याची साखळीची रिकव्हरी केली. तसेच साखळी त्याच्या मूळ मालकाला परत करण्यात आली आहे. तर दुसरीकडे बोरवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 19 वर्षापूर्वी तक्रारदार रमेश पटेल यांचा 2020 नग कच्चे हिरे चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी 19 वर्षानंतर ते पुन्हा मिळवून मूळ मालकाला परत केलेले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details