महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

देशभरात कोरोनाची दुसरी लाट? जाणून घ्या संसर्गरोग तज्ज्ञांचे विश्लेषण - 2nd wave of corona

देशात थंडी वाढल्यानंतर कोरोनाची लाट पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. पश्चिमी राष्ट्रांमध्ये याला सुरुवात झाली असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही त्याबाबत सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत. याच अनुषंगाने कोरोनाची दुसरी लाट म्हणजे काय, तिचा देशासह राज्यावर होणारा परिणाम, याबाबत इंग्लंडमधील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. संग्राम पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्लाझमा थेरपी, कोरोना लस आणि अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.

doctor sangram patil
देशभरात कोरोनाची दुसरी लाट? जाणून घ्या संसर्गरोग तज्ज्ञांचे विश्लेषण

By

Published : Nov 23, 2020, 5:44 PM IST

मुंबई -मागील आठ महिन्यांपासून सुरू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव अखेर नोव्हेंबर महिन्यात ओसरल्याचे चित्र आहे. मात्र देशात थंडी वाढल्यानंतर कोरोनाची लाट पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. पश्चिमी राष्ट्रांमध्ये याला सुरुवात झाली असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही त्याबाबत सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत. याच अनुषंगाने कोरोनाची दुसरी लाट म्हणजे काय, तिचा देशासह राज्यावर होणारा परिणाम, याबाबत इंग्लंडमधील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. संग्राम पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्लाझमा थेरपी, कोरोना लस आणि अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.

संपूर्ण मुलाखतीसाठी क्लिक करा -पश्चिमी राष्ट्रांप्रमाणे भारतातही कोरोनाची दुसरी लाट? जाणून घ्या संसर्गजन्य रोग तज्ज्ञांकडून

येणाऱ्या दोन महिन्यांत लोक मोठ्या संख्येने पुन्हा आजारी पडण्याचे प्रमाण वाढू शकते, असे डॉ. पाटील यांनी सांगितले. ही शक्यता वर्तवतानाच याआधी कोरोना संसर्गापासून वाचलेले लोक आता बाहेर पडत असल्याने त्यांना प्रादुर्भाव होऊन रुग्णसंख्येत भर पडण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. कोरोनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून येत्या थंडीत श्वसनाचे आजार असणाऱ्या व्यक्ती दुसऱ्या लाटेच्या आहारी जाण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. सण-कार्यक्रमांसाठी लोक एकत्र आल्याने पुन्हा एक 'पिक' येण्याची भीती डॉ.पाटील यांनी वर्तवली आहे.

येणाऱ्या दोन महिन्यांत लोक मोठ्या संख्येने पुन्हा आजारी पडण्याचे प्रमाण वाढू शकते, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

कोरोनाची 'दुसरी लाट' समजवतानाच डॉ. पाटील यांनी भारतातील प्लाझमा थेरपीसंदर्भात स्पष्टीकरण दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागल्यापासून देशभरात प्लाझमा डोनेट करण्यासाठी आवाहन करण्यात येत होते. प्लाझमा संदर्भात 'डबल ब्लाइंड कंट्रोल ट्रायल्स' पद्धती सुरू आहेत. अमेरिकेतील निरीक्षणांवर आधारीत सर्व्हेक्षण पुढे आले आहे. मात्र यातही मोठ्या प्रमाणात उपयोग झाल्याचे अद्याप नोंदवण्यात आले नाही, असे डॉ.पाटील यांनी सांगितले. ज्या प्रकारे एकाच लस सर्वांवर परिणामकारक नसते, तसेच मोजक्या लोकांवरच प्लाझमाचा परिणाम जाणवतो. यावर अद्याप ट्रायल्स सुरू आहेत. येत्या काही आठवड्यात यातून मोठा फरक जाणवल्यास प्लाझमाचा वापर वाढू शकतो, असे डॉ.पाटील म्हणाले.

कोरोनाची 'दुसरी लाट' समजवतानाच डॉ. पाटील यांनी भारतातील प्लाझमा थेरपीसंदर्भात स्पष्टीकरण दिले.

कोरोनावर लस आणण्यासाठी जगभरातील वैद्यकीय कंपन्या काम करत आहेत. ठिकठिकाणी संशोधन सुरू आहे. यातून फायजर, रेमडेसीवीर, जॉन्सन अॅन्ड जॉन्सन, एबोला टेक, ऑक्सफर्ड, इ. यांसारख्या कंपन्यांची लस बाजारात जास्त प्रभावी ठरत असल्याचे चित्र आहे. त्या अनुषंगाने येणाऱ्या काळात बाजारात लसींसंदर्भात सकारात्मक चित्र असणार आहे. अनेक देशांनी या लसींची पूर्व खरेदी केली आहे, अशी माहिती संसर्गजन्यरोग तज्ज्ञ डॉ. संग्राम पाटील यांनी दिली.

येणाऱ्या काळात बाजारात लसींसंदर्भात सकारात्मक चित्र असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details