मुंबई -राज्यात शिंदे व फडणवीस सरकार येऊन एक महिना उलटून गेला तरी राज्यमंत्री मंडळ विस्तार झालेला नाही. त्यातच वाढती महागाई, बेरोजगारी आणि मोदी सरकारची दडपशाही यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे देशभर होत असलेल्या आंदोलनाला चिरडण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. ( Congress Movement Against Inflation The Country ) तर दुसरीकडे शिंदे गटाच्या अपात्र आमदारांचा पेच सर्वोच्च न्यायालयात अडकलेला आहे. या सर्व विषयांवर राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी खास बातचीत केले आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी -
प्रश्न - आज देशभरात वाढती महागाई, बेरोजगारी, मोदी सरकारची दडपशाही याच्याविरोधात काँग्रेसकडून शांततेत आंदोलन करण्यात येत होते. परंतु, राज्यात मुंबईत तसेच बऱ्याच ठिकाणी याला केंद्र सरकारकडून विरोध करण्यात आला?
पृथ्वीराज चव्हाण - केंद्र सरकारकडून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तसा संदेश गेलेला आहे. हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी व हे आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात यावे अशा पद्धतीचा संदेश केंद्र सरकारकडून विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गेला. परंतु हे आंदोलन आम्ही कशासाठी करत आहोत हे समजून घेतले पाहिजे. आज देशात महागाई, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. केंद्र सरकारचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटलेल आहे. ही चूक आता त्यांना लक्षात आली आहे आणि म्हणूनच यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. परंतु, आज पहाटेपासून आमच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करण्यात आली. फक्त मुंबईतच १० हजार कार्यकर्त्यांना नोटीस पाठवून त्यांना अटक करण्यात आली. आमच्या वरिष्ठ नेत्यांना विधान भवनातून तर मला हँगिंग गार्डन येथून ताब्यात घेण्यात आले. केंद्र सरकार का, घाबरते आहे हे मला समजत नाही. मुख्यमंत्री केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे निर्णय घेत आहेत हे चुकीचे आहे.
हेही वाचा -congress agitation : महागाईच्या विरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन सुरू
प्रश्न - एकीकडे देशभरात महागाईने उच्चांक गाठलेला असताना, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या महागाई वाढलेली नसल्याचे सांगत आहेत. त्याचबरोबर भाजपचे नेतेसुद्धा महागाई विरोधात बोलायला तयार नाहीत?
पृथ्वीराज चव्हाण -हा विरोधाभास आहे. जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे सरकार करत आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने विविध पद्धतीने आंदोलन करत आहोत. ही अघोषित आणीबाणी आहे. आमच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना नोटीसा पाठवण्याचे काम हे सरकार करत आहे. घरातून बाहेर पडायचे नाही. आंदोलन करायची नाहीत. शांततेच्या मार्गाने घरातून बाहेर पडून आंदोलन जरी केले तरी तुरुंगात जावे लागत आहे. परंतु, महाराष्ट्रातील जनता हे सर्व पाहत आहे. लोकांचे प्रश्न मांडण्याचे काम सध्या काँग्रेस करत आहे. परंतु, मोदी सरकार दडपशही मार्गाने ते चिरडण्याचं काम करत आहे.
प्रश्न - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइल चे भाव कमी झाले. तरीसुद्धा महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. इंधनाच्या दरामध्ये कमी होताना दिसत नाही, याला नेमकं कारण काय आहे?