मुंबई - दिल्लीतील जाफराबाद व मौजपूर या ठिकाणी झालेल्या हिंसेनंतर अन्य शहरांमध्ये या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी शहर पोलिसांनी विविध संवेदनशील परिसरातून काही जणांना ताब्यात घेतले आहे. सोमवारी(24 फेब्रुवारी) रात्री उशिरा गेट वे ऑफ इंडियाजवळ काही आंदोलनकर्त्यांनी परवानगी न घेता जमण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दरम्यान मुंबई पोलिसांनी गेट वे ऑफ इंडिया जवळ मोठा पोलीस बंदोबस्त ठेवल्याने काही आंदोलनकर्त्यांना त्याठिकाणी येता आले नाही. यामुळे जवळपास 25 ते 30 आंदोलनकर्त्यांनी मरीन ड्राईव्ह परिसरात कॅन्डल मार्च केला.
दिल्ली हिंसाचार: मुंबईत पोलीस अलर्टवर, खबरदारीसाठी काही संशयित ताब्यात - delhi stone pelting issue
दिल्लीतील जाफराबाद व मौजपूर या ठिकाणी झालेल्या हिंसेनंतर अन्य शहरांमध्ये या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी शहर पोलिसांनी विविध संवेदनशील परिसरातून काही जणांना ताब्यात घेतले
दिल्लीतील जाफराबाद व मौजपूर या ठिकाणी झालेल्या हिंसेनंतर अन्य शहरांमध्ये या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईत कायदा व सुव्यवस्थेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न होणार असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली. यानंतर ठिकठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना तत्काळ ताब्यात घेतले. पोलीस परवानगी न घेता आंदोलन करणाऱ्या दहा जणांची ओळख पोलिसांकडून करण्यात आली आहे. लवकरच संबंधित व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल होणार आहे.