महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईतील राजभवनात एसआरपीएफ जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न - SRPF

एसआरपीएफ जवानाने घरगुती वादातून स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. मलबार येथील राजभवन येथे ही घटना घडली. जवानाची प्रकृती चिंताजनक आहे.

संग्रहित छायाचित्र

By

Published : Oct 8, 2019, 12:58 AM IST

मुंबई- मुंबईतील मलबार येथील राजभवन येथे कार्यरत असलेले दिपक दत्तात्रय चव्हाण (वय, 28) या एसआरपीएफच्या जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घरगुती वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली

एसआरपीएफ जवान दिपक दत्तात्रय चव्हाण यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात कौटुंबिक वादातून आत्महत्या करित असल्याचे नमुद केले आहे. राजभवन पोलिसांनी दत्तात्रय चव्हाण यास बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जखमी जवानावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. प्रकरणी मलबार हिल पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details