महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एसटी कामगारांचे आंदोलन चिघळले, मंत्रालयासमोर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण होण्यासंदर्भात अजूनही अंतिम तोडगा निघत नसल्याने एसटी कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मेटाकुटीला आले आहे. आज (दि. 14) जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व एसटी कर्मचाऱ्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. याबाबत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

एसटी
एसटी

By

Published : Nov 14, 2021, 4:18 PM IST

मुंबई- एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण होण्यासंदर्भात अजूनही अंतिम तोडगा निघत नसल्याने एसटी कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मेटाकुटीला आले आहे. आज (दि. 14) जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व एसटी कर्मचाऱ्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. याबाबत मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

एसटी कामगारांचे आंदोलन चिघळले, मंत्रालयासमोर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

सरकारची उदासीनता, चालढकल

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीसाठी नेमण्यात आलेल्या समितीला या बाबतचा अहवाल लवकरात लवकर देण्याचे तसेच सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला काल (दि. 13) दिले होते व संप मागे घेण्याचे आव्हान केले होते. पण, या बैठकीत कुठलाही ठोस निर्णय झाला नसल्याने हे आंदोलन आता अजून चिघळले असून त्याचा उद्रेक आता होताना दिसत आहे. आज एसटी कामगारांना पाठिंबा देताना जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट मंत्रालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत मंत्रालयाच्या गेटवरच अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मागील बऱ्याच दिवसापासून एसटी कामगार मंत्रालयात घुसण्याच्या तयारीत होते. पण, पोलिसांनी त्यांना अटकाव केला होता. आज (रविवार) सुटीचा दिवस असल्याने हे कार्यकर्ते थेट मंत्रालयाच्या गेटपर्यंत पोहोचले.

बारा आठवड्यांची मुदत कमी करावी

एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. ती समिती बारा आठवड्यांत अहवाल देणार असल्याने या समितीने विलीनीकरणाची शिफारस केल्यास ते आम्हाला मान्य असेल, असे सांगतानाच अहवाल लवकर देण्यासाठी समितीला सांगण्यात येईल, असेही अनिल परब यांनी काल शिष्टमंडळाला सांगितले आहे. सरकारने 12 आठवड्याची मुदत कमी करण्यासाठी सकारात्मक भूमिका दाखवली असली तरी सरकार याबाबत चालढकल करत असल्याचे एसटी कामगारांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा -Maharashtra Corona Update : राज्यात 999 नवीन कोरोनाबाधित तर 49 जणांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details