नवी मुंबई-नवी मुंबई परिसरातील खारघरमध्ये मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन परवानगी नसताना करण्यात आले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केल्याने उद्घाटनप्रसंगी सोशल डींस्टनसिंगचा बोजवारा उडाला. राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. मात्र शासनाच्या नियमांचे राजकीय पक्षचं पालन करत नसल्याचे या प्रकारावरून दिसते. त्यामुळे कोरोना पसरण्याची भीती नाकारता येत नाही.
खारघरमध्ये मनसे कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा - मनसे आमदार राजू पाटील
नवी मुंबई परिसरातील खारघरमध्ये मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन परवानगी नसताना करण्यात आले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केल्याने उद्घाटनप्रसंगी सोशल डींस्टनसिंगचा बोजवारा उडाला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त व्यक्तींनी एकत्र येऊ नये. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे. असा नियम सर्वत्र असताना नवी मुंबईतील खारघर परिसरात मनसेच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सोशल डिस्टन्सचा बोजवारा पाहायला मिळाला.
यावेळी मनसेचे नेते नितीन सरदेसाई व आमदार राजू पाटील उपस्थितीत होते. मनसेच्या या उद्घाटन सोहळ्याला 300 हुन अधिक कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारे सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे नियम फक्त सामान्य नागरीकांसाठी आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.