मुंबई- नायर रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉ. पायल तडवी यांनी तेथील वरिष्ठ डॉक्टरांच्या जातीयवादी मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. या घटनेतील आरोपी महिला डॉक्टर फरार झाल्या असून त्यांना अटक करण्याची मागणी अनेक संघटनांकडून होत आहे.
पायलला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक संघटना देणार नायरवर धडक - vanchit bahujan aghadi
पायल हिला न्याय मिळावा, यासाठी आज वंचित बहुजन आघाडी, एसएफआय, भारतीय लोकसत्ताक या संघटना तसेच पुरोगामी, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते या संघटना आज नायर रुग्णालयाच्या बाहेर निदर्शने करणार आहेत.
पायल हिला न्याय मिळावा, यासाठी आज वंचित बहुजन आघाडी, एसएफआय, भारतीय लोकसत्ताक या संघटना तसेच पुरोगामी, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते या संघटना आज नायर रुग्णालयाच्या बाहेर निदर्शने करणार आहेत.
डॉ. तडवी हिच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना पोलिसांनी पळण्यासाठी मदत केल्याचा गंभीर आरोप काल प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता. यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. डाव्या आणि आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या आरोपींना अटक तसेच पायलला न्याय मिळवून देण्यासाठी आज या संघटना नायर रुग्णालयाच्या गेटबाहेर निदर्शने करणार आहेत.