महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Snake Bite to Salman Khan : अभिनेता सलमानला चावला साप.. ७ तासांच्या उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज - salman khan Discharged From Hospital

सलमान खानचे पनवेलमधील वाजेपूर येथे अर्पिता फार्महाऊस आहे. या फार्महाऊसवर सलमान विश्रांतीसाठी तसेच मित्रमंडळींसोबत येत असतो. दरम्यान, काल याच फार्महाऊसमध्ये सलमानला सर्पदंश झाला. त्यानंतर तातडीने त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याची प्रकृती उत्तम असल्याने त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले.

अभिनेता सलमान खान१
अभिनेता सलमान खान

By

Published : Dec 26, 2021, 1:12 PM IST

Updated : Dec 26, 2021, 4:34 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळख असलेल्या सलमान खानला सर्पदंश ( Snake Bite to Salman Khan ) झाल्याची माहिती समोर आली आहे. सलमान खान हा त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसमध्ये असताना ही घटना घडली. दरम्यान, सलमानला साप चावल्यानंतर त्याला पहाटे ३.३० वाजता कामोठे येथील एमजीएम रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. उपचारांनंतर सलमान खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

अभिनेता सलमानला चावला साप.. ७ तासांच्या उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज

सलमान खानचे पनवेलमधील वाजेपूर येथे अर्पिता फार्महाऊस ( Arpita Farm House Panvel ) आहे. या फार्महाऊसवर सलमान विश्रांतीसाठी तसेच मित्रमंडळींसोबत येत असतो. दरम्यान, काल याच फार्महाऊसमध्ये सलमानला सर्पदंश झाला. त्यानंतर तातडीने त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याची प्रकृती उत्तम असल्याने त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. सोमवारी, 27 डिसेंबर रोजी सलमान खानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फार्म हाऊसवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. आज, रविवारीदेखील काही सेलिब्रेटी फार्म हाऊसवर येणार होते. मात्र, या घटनेनंतर सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

परिसर डोंगरांनी वेढलेला

एमजीएम रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितले की, सलाम खान यांची प्रकृती ठीक असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. सलमानच्या फार्म हाऊसच्या आजूबाजूला अनेक झाडे आणि झाडे आहेत आणि हा परिसर डोंगरांनी वेढलेला आहे, त्यामुळे याला धोका कायम आहे. सलमान खान सध्या त्याच्या फार्म हाऊसवर आराम करत आहे. एमजीएम रुग्णालयाचे दोन डॉक्टर सलमान खानसोबत आहेत. सलमान खान डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.

उद्या सलमान खानचा वाढदिवस

ख्रिसमसच्या निमित्ताने सलमान खान, त्याचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी फार्म हाऊसवर पोहोचली होती. तेव्हा ही घटना घडली. सलमान खानचा वाढदिवसही २७ डिसेंबरला आहे. अशा स्थितीत आता वाढदिवसानिमित्त मोठा सोहळा होण्याची शक्यता नाही.

Last Updated : Dec 26, 2021, 4:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details