महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

TET scam case : ईडीकडून टीईटी घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद

ईडीने टीईटी (Teacher Eligibility Test ) घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद केली आह. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (Teacher Eligibility Test) घोटाळा ( TET Scam in Maharashtra ) प्रकरणाचे लोण थेट सिल्लोडपर्यंत पोहोचले आहे.

TET Exam
TET परीक्षा

By

Published : Aug 8, 2022, 3:04 PM IST

मुंबई - ईडीने टीईटी (Teacher Eligibility Test ) घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद केली आह. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (Teacher Eligibility Test) घोटाळा ( TET Scam in Maharashtra ) प्रकरणाचे लोण थेट सिल्लोडपर्यंत पोहोचले आहे. परीक्षा परिषदेकडून जी यादी जाहीर करण्यात आली, त्यामधील सर्व अपात्र असणाऱ्या लोकांनी पात्र होण्यासाठी सुपे यांना पैसे दिले होते. मात्र, सुपे ( TET scam accused Tukaram Supe ) यांच्याकडून अपात्र उमेदवारांना पात्र असण्याचे सर्टिफिकेट मिळाले नाहीत. ( Abdul Sattar in Trouble ) यात माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार ( Former State Minister Abdul Sattar ) यांच्या दोन मुलींचाही समावेश आहे. परंतु, अब्दुल सत्तार यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

हेही वाचा -Sanjay Raut judicial custody : शिवसेना नेते संजय राऊत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; 22 ऑगस्ट पर्यंत मुक्काम

टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आली : या यादीमध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील काही उमेदवारांचा समावेश असून, यादी जाहीर झाल्यानंतर गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची नावेही समोर आलेली आहेत. या टीईटी घोटाळ्यात सिल्लोडचे आमदार, माजी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उजमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन मुलींचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.
हीना आणि उजमा या दोन्ही शिक्षिका अब्दुल सत्तार यांच्या मुली असून, २०२० मध्ये त्या अपात्र आहेत. सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी जी यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये या दोघींच्या नावांचा समावेश आहे. उजमा आणि हिना यांनी कुठल्या एजंटला पैसे दिले हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत.

काय म्हणाले अब्दुल सत्तार :या प्रकरणावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, २०१९ मध्ये टीईटीचा निकाल हा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे. माझ्या मुलींनी परीक्षा दिल्या, पण त्या पास झाल्या नाहीत, त्या अपात्र ठरल्यात. शिक्षण खात्यामध्ये कोणीही माहितीच्या अधिकारात माहिती घेऊ शकतो. माझ्या संस्थेमध्ये २०१७ मध्ये माझ्या मुली नोकरीला लागल्या. तेव्हा त्यांनी परीक्षा दिली त्यात त्या अपात्र झाल्या. हे मला बदनाम करण्याचे काम असून, आमची चूक असेल तर माझ्या मुलींवर कारवाई करा. परंतु, नसेल तर ज्याने हे कृत्य केले आहे, त्याला फासावर लटकवा.

हेही वाचा -MH cabinet Expansion :अखेर ठरलं! 'या' दिवशी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार

ABOUT THE AUTHOR

...view details