मुंबई - मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहातील फाऊंटनच्या वर असलेला मोठा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले आहेत. बैठक सुरु असतानाच बाहेर स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला; आदित्य ठाकरे थोड्क्यात बचावले
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहातील फाऊंटनच्या वर असलेला मोठा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेतून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले आहेत.
आदित्य ठाकरे
सह्याद्री अतिथीगृहातील 4 क्रमांकाच्या हॉल बाहेरील स्लॅब अचानक कोसळल्याने सह्याद्री अतिथीगृहात एकच खळबळ उडाली. यावेळी मंत्र्यांची चांगलीच धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या दुर्घटनेतून सर्वजण सुखरुप बाहेर पडल्याची माहिती मिळत आहे.