मुंबई -नवाब मलिक यांना भेटण्यासाठी आलेल्या बहीण सईदा खान (Nawab Malik Sister Saida Khan) ला ईडी कार्यालयात प्रवेश दिला गेला नाही. मंत्री नवाब मलिक यांची बहीण सईदा खान दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात पोहोचली होती.
काल नवाब मलिक याना ईडीने अटक केली असून त्यांना न्यायालयाने 7 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक(Minister Nawab Malik) यांची बुधवारी सकाळपासूनच ईडी कार्यालयात चौकशी सुरू होती. अखेर नवाब मलिक यांना आता ईडीने अटक केली (Nawab Malik arrested by ED) आहे. कुर्ल्यातील एका जमीन खरेदी-विक्री प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना् ईडीने अटक केली आहे. मलिक यांची ईडीकडून आज तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली. नवाब मलिक यांना जे जे रुग्णालयात मेडिकल तपासणीसाठी नेण्यात आले आहे. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार आहे.