महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 26, 2022, 3:46 PM IST

Updated : Jan 26, 2022, 10:39 PM IST

ETV Bharat / city

Tipu Sultan Stadium : टिपू सुलतान क्रीडांगण नामकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजप, बजरंग दलाची निदर्शने, अखेर झाले नामकरण

मुंबई - मुंबईतील मालाड परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या क्रीडांगणाच्या नामकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. म्हैसूरचे राजे टिपू सुलतान यांच्या नावावरून राज्य सरकारचे मंत्री अस्लम शेख यांनी मैदानाला नाव देण्यास भाजपने विरोध केला ( Tipu Sultan stadium mumbai ) आहे. तर आज या परिसरात मोठ्या प्रमाणात भाजप आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते विरोध करताना ( Bajarang Dal workers agitations in Malad ) दिसत आहेत. तसेच मुंबई पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले आहे.

Tipu Sultan Stadium
टिपू सुलतान क्रीडांगण नामकरणाचा वाद चिघळण्याची चिन्हे

मुंबई - मुंबईतील मालाड परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या क्रीडांगणाच्या नामकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. म्हैसूरचे राजे टिपू सुलतान यांच्या नावावरून राज्य सरकारचे मंत्री अस्लम शेख यांनी मैदानाला नाव देण्यास भाजपने विरोध केला ( Tipu Sultan stadium mumbai ) आहे. तर आज या परिसरात मोठ्या प्रमाणात भाजप आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते विरोध करताना ( Bajarang Dal workers agitations in Malad ) दिसत आहेत. तसेच मुंबई पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले आहे.

परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त; कार्यकर्त्यांकडून निदर्शने

भाजपा, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन -

मुंबई मालाड येथील मालवणीच्या टिपू सुलतान मैदानाबाबत आता राजकारण चांगलेच तापले असून, टिपू सुलतान मैदानाचे उद्घाटन आज सायंकाळी साडे पाच वाजता पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते होणार आहे. मात्र त्याआधी काल संध्याकाळपासून भाजप बजरंग दल विश्व हिंदू परिषदेने सातत्याने आंदोलन केले. आणि आरएसएसचे लोक सातत्याने मागणी करत आहेत की टिपू सुलतानच्या नावाने मैदान आहे. या मैदानाचे नामांतर करू नये, त्याला विरोध करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत मुंबई पोलिसांनी आधीच चांगली तयारी केली आहे, मात्र असे असतानाही बजरंग दल, भाजप, विश्व हिंदू परिषदेच्या हजारो कार्यकर्त्यांनी मैदानापूर्वीच सुमारे 500 मीटर अंतरावर बॅरिकेड्स लावले आहेत. जिथे आंदोलक रस्त्यावर बसून आंदोलन करताना दिसत आहेत. उद्घाटन स्थळापूर्वीच पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

पालकमंत्री अस्लम शेख यांची प्रतिक्रिया

'भाजपने मुंबईत सर्वप्रथम टिपू सुलतानचे नाव घेतले'

सध्या पालकमंत्री अस्लम शेख उद्घाटनासाठी मैदानावर पोहोचले आहेत. त्यांनी सांगितले की, भाजपने मुंबईत सर्वप्रथम टिपू सुलतानचे नाव घेतले होते. मालवणीच्या या मैदानाबद्दल बोलायचे झाले तर हे मैदान १५ वर्षे जुने आहे. त्यांनी या ठिकाणी फित कापून उद्घाटन कार्यक्रम पार पाडला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता.

'शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर का' -राम कदम

मालाड येथील एका उद्यानाला टिपू सुलतान ( Tipu Sultan Sports Complex ) यांचे नाव द्यायचं ठरल आहे. यावरून आता शिवसेना व भाजपा यांच्यात खडाजंगी रंगली असताना शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा या नावावरून आक्रमक झालेले आहेत. त्यातच भाजपा नेते आमदार राम कदम यांनी राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर का उतरतात, असा प्रश्न भाजपा आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे. तसेच विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनीही या मुद्यावरुन आघाडी सरकारवर तोफ डागली आहे.

हेही वाचा -Tipu Sultan stadium Naming : क्रीडांगणाच्या नामकरणावरून भाजपा, बजरंग दलाचे मुंबईत निदर्शने

Last Updated : Jan 26, 2022, 10:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details