मुंबई -हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कोणच्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. आता यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. राज्यातील धर्मांध शिक्षण देणारे मदरसे बंद करण्याचे धाडस मुख्यमंत्रीदाखवणार का?, असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.
खरे हिंदुत्व दाखवत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सर्व मदरसे बंद करावेत - अतुल भातखळकर
हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कोणच्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. आता यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. राज्यातील धर्मांध शिक्षण देणारे मदरसे बंद करण्याचे धाडस मुख्यमंत्री दाखवणार का?, असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील मदरसे वाढविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो, त्यातून कोणतेही आधुनिक शिक्षण न देता केवळ एका विशिष्ट धर्माचे शिक्षण दिले जाते. राज्यातील करदात्यांच्या पैशावर चालणारा हा प्रकार अत्यंत चूक असून, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मदरसे व तेथील मौलवींना दिली जाणारी आर्थिक मदत तात्काळ थांबवावी. तसेच मुस्लीम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात थेट मदत द्यावी, अशी मागणी सुद्धा अतुल भातखळकर यांनी केली आहे .
शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन वसिम रिझवी यांनी तर मदरशांना दहशतवादी संघटनांकडून पैसे पुरविले जात असल्याने, मदरशांवर बंदी घालावी, अशी मागणी केली होती. याचा देखील राज्य सरकारने गांभीर्याने विचार करावा. आसाम सरकारने मदरसे बंद करण्याचा निर्णय घेतला, त्याचे मी स्वागत करतो, असेही भातखळकर म्हणाले.