महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लस ही कवच-कुंडल.. मात्र लस घेतल्यानंतरही होऊ शकतो कोरोना - राजेश टोपे - health minister rajesh tope

राज्यात लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. मात्र अनेक वेळा लसीकरण झाल्यावर एक ते दोन महिन्यानंतर कोरोना झाल्याची उदाहरणे समोर आलेली आहेत. लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही असं नसून, जर लसीकरण झाल्यानंतरही काळजी घेतली गेली नाही, तर कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे.

Rajesh Tope
Rajesh Tope

By

Published : Mar 17, 2021, 7:04 PM IST

Updated : Mar 17, 2021, 7:24 PM IST

मुंबई -राज्यात लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. मात्र अनेक वेळा लसीकरण झाल्यावर एक ते दोन महिन्यानंतर कोरोना झाल्याची उदाहरणे समोर आलेली आहेत. लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही असं नसून, जर लसीकरण झाल्यानंतरही काळजी घेतली गेली नाही, तर कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांमधील राज्यांच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. या चर्चेत वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भावावर चिंता व्यक्त केली गेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या चर्चेत सामील झाले होते. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत चाललेला आहे. यासंदर्भात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाली असून राज्यातील चाचण्या वाढवल्या गेल्या पाहिजेत. तसेच राज्याला लसीचा पुरवठाही अधिक हवा. या संदर्भाची साधक-बाधक चर्चा या बैठकीत केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून झाली.

हाफकीन औषध निर्मिती संस्थेला लस निर्मितीची परवानगीची मागणी -

पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे
कोरोनासारख्या संसर्गाला रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पाऊले उचलण्यात येतील असा, विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. तसेच अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी जेणेकरून लसीकरणाचा वेग वाढवता येईल. भारत बायोटेकची टेक्निक हाफकिन या संस्थेला देण्याची मागणी यावेळी पंतप्रधानांकडे करण्यात आली. त्यामुळे लस मोठ्या प्रमाणात लस उत्पादन होऊ शकेल. त्यामुळे लवकरात लवकर सर्वाना कोरोनाची लस उपलब्ध होऊ शकेल, असा सल्ला ही पंतप्रधानांना देण्यात आला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात सर्व राज्यांमध्ये लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ व प्रोत्साहन देण्यात येईल, असे जाहीर केले.

हे ही वाचा - नोकिया १० हजार कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढणार; 5 जी तंत्रज्ञानावर करणार लक्ष्य

राज्यात लसीकरण प्रमाण चांगले, मात्र आणखी प्रमाण वाढले पाहिजे -

लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राचे काम समाधानकारक आहे असे आज सादरीकरणाच्या सांगण्यात आले. महाराष्ट्रात आज सरासरी प्रत्येक दिवशी १ लाख ३८ हजार ९५७ डोस देण्यात येतात. इतर काही प्रमुख राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण समाधानकारक आहे. मात्र ते आणखीही वाढवण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. राज्यात आजमितीस ३५ लाख ५२ हजार डोसेस देण्यात आले असून ३१ लाख ३८ हजार ४६३ डोसेस उपलब्ध आहेत. दररोज ३ लाख डोसेस दिल्यास १० दिवसांचा साठा असून तो अधिक वाढवून मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
हे ही वाचा - महाविकास आघाडीच्या नेत्यांचा बैठीकीचा सपाटा; वाझे प्रकरणावर चर्चा?

आरटीपीसीआर चाचणीबाबतही समाधान -

राज्याने आरटीपीसीआर चाचण्या मोठ्या प्रमाणावर करण्यास सुरुवात केली असून एकूण चाचण्यांपैकी ७० टक्के चाचण्या या पद्धतीने केल्या जातात. सध्या राज्यात 30 लाख कोरोनाचे रुग्ण असून यातील 75 टक्के रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत. सांगितले त्यामुळे रुग्णांना शोधण्यात कठिनाई येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या कानावर घातलं. मात्र तरीही राज्य सरकार कोरोनाच्या रुग्णांना शोधून त्यावर उपचार करण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांकडून यावेळी देण्यात आली. तसेच राज्यात rt-pcr चाचणी करत असल्यामुळे रुग्णांची संख्या राज्यात अधिक असल्याची शक्यता ही आरोग्यमंत्र्यांनी वर्तवली.

हे ही वाचा - 'पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन प्रकरणातील शवविच्छेदन अहवालात छेडछाड'
राज्याकडे तीस लाख लस उपलब्ध-आरोग्यमंत्री

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडून आठवड्याला 20 लाख लसीची मागणी केली. मात्र राज्याकडे अजूनही 30 लाख उपलब्ध असताना अशा प्रकारची मागणी राज्य सरकारकडून का केली जाते असा सवाल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विचारला होता. मात्र सध्या राज्यात दिवसाला तीन लाख लोकांना लसीकरण करावे लागते त्यानुसार केवळ दहा दिवसात 30 लाख लस संपणार आहेत तसेच दिवसाला तीन लाख लोकांचे लसीकरण केल्याने आठवड्याला जवळपास वीस लाख लस लागण्याची आवश्यकता असल्याने केंद्राकडून अशा प्रकारची मागणी केल्याचे स्पष्टीकरण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

Last Updated : Mar 17, 2021, 7:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details