महाराष्ट्र

maharashtra

Raut Keep Silence On CM : उद्धव ठाकरेंनाच व्हायचे होते मुख्यमंत्री, शिंदेंच्या गौप्यस्फोटावर राऊतांचे मौन

By

Published : Jul 6, 2022, 1:20 PM IST

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, असा गौप्यस्फोट नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी विधानसभेता केला होता. याबाबत शिवसेनेने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. शिवसेना नेते संजय राऊत ( Shivsena leader Sanjay Raut ) यांनी या विषयावर मी बोलणार नाही, असे म्हटल्याने जनतेची याबाबतची उत्सुकता वाढली आहे. राऊतांच्या नकारामुळे एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्यात तथ्य होते का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

cmxcm
cm cm

मुंबई -राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी सोमवारी सभागृहात बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यावर निशाणा साधला. शिवसेना आणि भाजपा युतीचे सरकार 2019 मध्ये स्थापन करण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेमध्ये भाजपा शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद द्यायला तयार होते. मात्र, शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद नाकारले. कारण आपल्याला ते द्यावे लागले असते. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री पद नाकारले असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला.

तो विषय आमच्यासाठी संपला - संजय राऊत



ठाकरे यांना व्हायचे होते मुख्यमंत्री -भाजपासोबत युती तुटल्यानंतर महाविकास आघाडी सोबत सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू झाली. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या नावाला अक्षय घेतला आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री व्हावे लागेल असा निरोप आपल्याला देण्यात आला. माझ्या नावाची आधी चर्चा झाली होती. मात्र अचानक हा निर्णय कसा घेतला गेला हे मी कधी विचारले नाही, परंतु त्यानंतर अजित पवार यांना एकदा खाजगीत विचारले असता अशा पद्धतीची कुठलीही अट आम्ही घातली नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते स्पष्ट होते, असा दावाही शिंदे यांनी सभागृहात केला. शिंदे यांच्या या गौप्यस्फोटानंतर विविध राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.


शिवसेनेने साधले मौन -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते हा थेट आरोप सभागृहातच केला. यासंदर्भात शिवसेनेचे नेते व महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली ते खासदार संजय राऊत मात्र या प्रकारावर बोलायला तयार नाहीत. या संदर्भातील प्रश्न आम्ही त्यांना विचारताच त्यांनी तो विषय आता संपला आहे, त्यावर बोलण्यासारखे काही नाही, असे सांगून उत्तर देणे टाळले. संजय राऊत यांच्या या प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यामुळे या प्रकारात तथ्य होते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा -सामंत, केसरकरांचा आयत्या बिळात नागोबाप्रमाणे शिवसेनेत प्रवेश, त्यांच्यामुळे.. - विनायक राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details