मुंबई: शिवसेना कोणाची या वादाचा चेंडू Shivsena vs Eknath Shinde सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या Supreme Court Election Commission कोर्टात टाकला आहे. दोन्ही बाजूंनी कागदपत्रे सादर करण्याची चढाओढ लागली आहे. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी Shiv Sena chief Uddhav Thackeray मुदत वाढवून मागितली होती. निवडणूक आयोगाने ठाकरेंना ७ ऑक्टबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आगामी अंधेरी पूर्व पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिन्हाचा वादावर पडदा पडणार का ? याबाबत साशंकता आहे.
Shivsena vs Eknath Shinde: शिवसेना कोणाची? कागदपत्रे सादर करण्यास ७ ऑक्टोबरपर्यंत मुदत - Shiv Sena chief Uddhav Thackeray
Shivsena vs Eknath Shinde: शिवसेना कोणाची या वादाचा चेंडू सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कोर्टात टाकला आहे. दोन्ही बाजूंनी कागदपत्रे सादर करण्याची चढाओढ लागली आहे. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुदत वाढवून मागितली होती. निवडणूक आयोगाने ठाकरेंना ७ ऑक्टबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आगामी अंधेरी पूर्व पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिन्हाचा वादावर पडदा पडणार का ? याबाबत साशंकता आहे.
कागदपत्रांची यादी सादर करण्याचे आदेश शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना कोणाची हा वाद न्यायप्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाने चिन्ह आणि पक्षाच्या वादावर निवडणूक आयोगाला मार्ग काढण्याचे सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर फुटीर शिंदे गट आणि शिवसेनेला कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. शिंदे गटाची कागदपत्रे मिळावीत. या ठाकरे गटाच्या मागणीवर शिंदे गटालाही निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. सविस्तर कागदपत्रांची यादी सादर करण्याचे आदेश आयोगाने शिंदे गटाला दिले आहेत. तर ठाकरे गट ही प्राथमिक कागदपत्रे ७ ऑक्टोबरपर्यंत सादर करणार असल्याची माहिती मिळत आहे.
पोटनिवडणूक जाहीर झाली शिवसेना आमदार रमेश लटके यांचे मे महिन्यात निधन झाले. त्यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली आहे. येत्या ३ नोव्हेंबरला राज्यातील विधानसभेच्या अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेकडून ऋतुजा लटके रिंगणात उतरणार आहेत. सेनेचे धनुष्यबाण चिन्ह वादात सापडल्याने शिवसेनेची डोकेदूखी वाढली आहे. मात्र, चिन्ह शिवसेनेला मिळाल्यास शिंदे गटाकडून पुन्हा आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने आपल्या विभागाची बैठक घेऊन अशी परिस्थिती निर्माण झाल्यास कोणते पर्याय उपलब्ध आहेत, किंवा काय करता येईल, याबाबत चाचपणी केली आहे.