ईडी प्रकरण : हे तर भाजपचे प्रदेश कार्यालय...सेनेचे बॅनर्स! - shivsena protests in dadar
शिवसेना आणि भाजप हा वाद गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला एका प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतर आगीत आणखी तेल ओतल्याची परिस्थिती ओढावली आहे.
मुंबईतील ईडी कार्यालयावर शिवसेनेतर्फे 'भाजप प्रदेश कार्यालय' असे बॅनर लावण्यात आले.
मुंबई - शिवसेना आणि भाजप हा वाद गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला एका प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतर आगीत आणखी तेल ओतल्याची परिस्थिती ओढावली आहे. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आता टीकेची झोड उठत आहे. यातूनच आज मुंबईतील ईडी कार्यालयावर शिवसेनेतर्फे 'भाजप प्रदेश कार्यालय' असे बॅनर लावण्यात आले.