मुंबई-शिवसेनेचे नेते बंडखोर शिंदे यांच्या गटात ३५ हून अधिक आमदार झाल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमकपणे बंडखोर नेत्यांचा समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी ट्विट करत बंडखोर नेते दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा..श्रीमान केसरकर.थोडा संयम ठेवा. डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका. आपण यांना ओळखता ना? जय महाराष्ट्र! असा खोचक ट्विट करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदार दीपक केसरकर आणि बंडखोर आमदारांना टोला लगावला आहे.
दीपक केसरकर यांच्या निवासस्थानवर दगडफेक-शिवसेनेशी फारकत घेवून शिंदे ( Stone pelting at MLA Deepak Kesarkar residence ) गटाशी संधान साधणार्या आमदार दिपक केसरकर यांच्या सावंतवाडी ( Deepak Kesarkar residence Sawantwadi news ) येथील निवासस्थानावर एका शिवसैनिकाकडून दगड फेक ( Stone pelting Deepak Kesarkar residence ) करण्यात आली. याच ठिकाणी आमदार दीपक केसरकर यांचे कार्यालय देखील आहे.
गटाला मान्यता देण्याची केसरकर यांची मागणी-बंडखोर आमदारांविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्याकडून बंडखोरांवर सातत्याने टीका केली जात आहे. तसेच, त्यांना महाराष्ट्रात येण्याचे आवाहन केले जात आहे. त्यावर आता बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी आपलं मतं मांडलं आहे. आणखी एक दोन आमदार आमच्या गटात सहभागी होती. त्यांच्या पाठिंब्याने आमचे संख्याबळ 51 पर्यंत जाईल. आम्ही 3 ते 4 दिवसांत निर्णय घेऊन महाराष्ट्रात येऊ, असे केसरकरांनी स्पष्ट केलं आहे. दीपक केसरकर म्हणाले की, शिंदे गटाचे आमदार विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जातील. मात्र, प्रथम एकनाथ शिंदे गटाला मान्यात द्यावी. आम्ही महाविकास आघाडी सरकारसोबत जाणार नाही, असेही केसरकरांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांची गद्दारांवर टीका-शिवसेना या चार अक्षरांमुळे ताकद, पैसा सर्वकाही मिळाले आहे. पक्षात येण्यापूर्वी तुम्ही कोण होता? असा प्रश्न उपस्थित करीत एकनाथ शिंदेंवर टीकेचे बाण सोडले. गुलाबराव पाटील पानटपरी चालवायचे. प्रकाश सुर्वे भाजीपाला विकायचे, संदीपान भुमरे साखर कारखान्यात सुरक्षारक्षक होते. त्यांना पक्षाने मोठे केले. शिवसेना पक्षात वैयक्तिक असा कोणीच मोठा नाही. पक्षाने दिलेली ताकद आणि संधी यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज मंत्रीपदावर जाता आले आहे. काहींना त्याचा आता विसर पडला. राऊत यांनी बंडखोर आमदारांसहित भाजपवर जोरदार सडकून रविवारी टीका केली.