मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदी शपथ ग्रहण केल्यानंतर नारायण राणे यांनी आज केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. मात्र यावर माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर अभिनंदन केले नाही, अशी टीका राणे यांनी केली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा काय प्रतिक्रिया त्यांनी दिली याची आठवण करावी, कोणत्या शब्दात अभिनंदन केले ते सांगावे. संकुचित आणि कुत्सित ही दोन उपाधी घेऊन वावरत असतात असे प्रत्युत्तर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी राणेंना दिले आहे.
'शिवसेनेवर टीका करण्यासाठी राणेंचा वापर केला जाईल'
'बाळासाहेब ठाकरे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका करायचे. पण त्या टीकेला स्टेटस होते. कॅबिनेटमध्ये काम करताना काय होते हे आता त्यांना कळेल.' त्या ठिकाणी सचिव नसतो त्यामुळे नक्कीच कळेल'. केंद्रातील भाजपा सरकारला डमी लोक हवे आहेत. शिवसेनेवर टीका करण्यासाठी त्यांचा वापर केला जाईल, असेही सावंत म्हणाले.