महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आदित्य यांना वरळीतून निवडणूक लढवण्यासाठी उद्धव ठाकरेंना घालणार साकडे - अनिल परब - Worli assembly constituency

उद्धव ठाकरेंनी आपली विनंती मान्य केली तर सर्व विरोधकांची डिपॉझिट जप्त करण्याची जबाबदारी आपण शिवसैनिकांनी घेतली पाहिजे. तसेच आदित्य ठाकरे हे या मतदारसंघातून १ लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील, अशी भावना परब यांनी व्यक्त केली.

अनिल परब

By

Published : Aug 31, 2019, 1:33 PM IST

मुंबई -आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असे मत शिवसेना आमदार अनिल परब यांनी शुक्रवारी व्यक्त केले. ते शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते.

हेही वाचा -आदित्य ठाकरेंची यात्रा जनआशीर्वादासाठी की फडणवीस सरकारची पोलखोल करण्यासाठी?

वरळी येथे शुक्रवारी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात गटप्रमुखांनी वरळी मतदारसंघातून आदित्य यांनी निवडणूक लढवण्याची मागणी केली. त्यानंतर परब यांनी गटप्रमुखांना सांगितले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपण यासंबंधी साकडे घालू आणि आदित्य यांना निवडणूक लढवण्यास सांगू, असे म्हटले.

हेही वाचा -जनआशिर्वाद यात्रा : आदित्य ठाकरेंचे बुलडाण्यात भावी मुख्यमंत्री म्हणून स्वागत

उद्धव ठाकरेंनी आपली विनंती मान्य केली तर सर्व विरोधकांची डिपॉझिट जप्त करण्याची जबाबदारी आपण शिवसैनिकांनी घेतली पाहिजे. तसेच आदित्य ठाकरे हे या मतदारसंघातून १ लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील, अशी भावना परब यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री फडणवीसांना टोला

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी परब यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी परब शिवसेनेचे अधिकृत प्रवक्ते आहेत का? असा सवाल उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना परब यांनी मी शिवसेनेचा अधिकृत प्रवक्ता असल्याचे सांगितले.

हेही वाचा -मुख्यमंत्र्यांच्या रथावर अब्दुल सत्तार सवार; पूरग्रस्तांसाठी २५ लाखाचा धनादेश दिला

काय म्हणाले अनिल परब?

आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभेची निवडणूक लढवावी आणि राज्याचे नेतृत्व करावे, अशी मागणी वरळी मतदारसंघातील गटप्रमुखांनी केली होती. या मागणीवर परब यांनी शिक्कामोर्तब करत येथील उमेदवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार आणि तो मुख्यमंत्री म्हणजे आदित्य ठाकरे आहेत, असे जाहीर केले.

ABOUT THE AUTHOR

...view details