महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shivsena Meeting With Independent MLA : राज्यसभेसाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी, 'वर्षा'वर पार पडली अपक्ष आमदारांसोबत बैठक

राज्यसभेच्या सहाव्या जागेकरिता छत्रपती संभाजीराजे ( Chhatrapati Sambhaji Raje ) आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray Meeting With Independent MLA ) यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी अपक्ष आमदारांची आज बैठक पार पडली.

Shivsena Meeting With Independent MLA
Shivsena Meeting With Independent MLA

By

Published : May 20, 2022, 10:22 PM IST

मुंबई -राज्यसभेच्या सहाव्या जागेकरिता छत्रपती संभाजीराजे ( Chhatrapati Sambhaji Raje ) आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray Meeting With Independent MLA ) यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी अपक्ष आमदारांची आज बैठक पार पडली. दरम्यान, शिवसेनेचा दुसरा आणि राज्यसभेची सहावी जागा निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी करण्याबाबत चर्चा झाली.

राज्यात १३ अपक्ष आमदार आहेत. त्यापैकी सात आमदार आजच्या बैठकीला उपस्थित होते. राजेंद्र पाटील-यड्रावकर (कोल्हापूर), मंजुषा गावित (धुळे), गीता जैन (मीरा-भाईंदर), किशोर जोरगेवार (चंद्रपूर) आशिष जैयस्वाल (रामटेक) विनोद अग्रवाल (गोंदिया) आणि नरेंद्र भोंडेकर (भंडारा) हे अपक्ष आमदारांचा समावेश होता. राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या सहा जागांकरिता येत्या दहा जूनला निवडणुका होणार आहेत. भाजपकडून दोन जागा लढणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसकडून प्रत्येकी एक जागा लढवली जाणार आहे. उर्वरित दोन जागांवर शिवसेनेने दावा केला आहे. शिवसेनेच्या मताधिक्यावर एक जागा सहजरित्या निवडून येऊ शकते. तर सहाव्या जागेसाठी शिवसेनेला आघाडीतील घटकपक्ष आणि अपक्ष आमदारांची मदत घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजी राजे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे सहाव्या जागेची निवडणूक चुरशीची बनली आहे.

अपक्ष आमदारांवर मदार -राज्यसभेवर जाण्यासाठी एका उमेदवाराला 42 मताधिक्याची आवश्यकता आहे. शिवसेनेकडे 55 आमदार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54 आणि काँग्रेसकडे 44 उर्वरित 16 घटक पक्ष आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडे चार जागा निवडून येण्याची क्षमता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. घटक पक्षांचे देखील शिवसेनेला समर्थन असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच शिवसेनेने सहाव्या जागेवर दावा केला आहे. आघाडीतील मताधिक्य फुटू नये, यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अपक्ष आमदारांची आज बैठक घेतली. दरम्यान संभाजीराजे शिवसेनेकडून निवडणूक लागल्यास त्यांना बहुमताने पाठिंबा देऊन निवडून आणण्याबाब उद्धव ठाकरेंनी चर्चा केल्याचे समजते. त्यामुळे शिवसेनेची ऑफर संभाजीराजे स्वीकारतील, सांगण्यात येत आहे.

संभाजीराजांना भाजपने दुखावले -राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजी राजे यांची भाजपने वर्णी लावली. मात्र, गेल्या सहा वर्षांपासून भाजपकडून संभाजीराजांवर मराठा आरक्षण मुद्द्यावरून आघाडी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी दबाव वाढवला जात होता. चंद्रकांत पाटील आणि संभाजीराजांमध्ये यावरून अनेकदा वाद हे रंगला. भाजपकडून सातत्याने दुखावले जात असल्याने संभाजीराजे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राज्यसभेच्या जागेकरिता अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या निवडणुकीत आता राज्यात चुरस वाढली आहे.

हेही वाचा -Indrani Mukherjea : शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी यांची भायखळा तुरुंगातून सुटका, दिली पहिली प्रतिक्रिया, मी खूप...

ABOUT THE AUTHOR

...view details