मुंबई -राज्यातील सत्तासंघर्ष अधिक तापताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी संजय राऊत यांनी एक विधान केले आहे. 'आमच्याकडे इतरही पर्याय आहेत, पण ते आम्हाला स्वीकारायला भाग पाडू नका' असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
हेही वाचा... राज्यात सत्ता स्थापनेसाठी दबावतंत्र, रावतेंनंतर मुख्यमंत्र्यांनीही घेतली राज्यपालांची भेट
सोमवारी देवेंद्र फडणवीस आणि दिवाकर रावते यांनी राज्यपालांची स्वतंत्र भेट घेतल्यानंतर राज्यात चर्चांना उधाण आले होते. यानंतर संजय राऊत यांच्या नव्या विधानाने भाजपला सावध करण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा... शिवसेना नेते दिवाकर रावतेंनी घेतली राज्यपालांची भेट
शरद पवार कधीच भाजपसोबत जाणार नाही
भाजपसोबत निवडणूकपूर्व युती असूनही सरकार तयार करण्यास वेळ का लागत आहे, असा प्रश्न राऊत यांना विचारले असता, त्यांनी 'महाराष्ट्रात कोणतेही दुष्यंत नाही ज्यांचे वडील तुरुंगात आहेत, असे म्हटले आहे. इथे आम्ही नेहमीच धर्म आणि सत्याचे राजकारण करत आहोत. शरद पवार यांनी भाजप आणि काँग्रेसविरुद्ध वातावरण निर्माण केले होते, त्यामुळे ते कधीच भाजपबरोबर जाणार नाहीत.
हेही वाचा... अपक्षांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ पोहचले ६० वर
शिवसेनेला सत्तेची भुक नाही
'उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्याकडे इतर पर्यायही आहेत. पण ते पर्याय स्वीकारण्याचे पाप आम्हाला करायचे नाही. शिवसेनेने नेहमीच सत्याचे राजकारण केले आहे, आम्हाला सत्तेची भूक नाही,' असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.