मुंबई- खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) व आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांचे दाऊदशी संबंध असल्याचे समोर आले आहे. राणा यांना पोलीस ठाण्यात भेटायला गेलेल्या किरीट सोमैया ( BJP Leader Kirit Somaiya ) यांनी याचेही उत्तर द्यावे, असे आवाहन मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ( Shivsena Leader Kishori Pednekar ) यांनी केले आहे. तसेच सोमैया यांची जखम सुपरफिशल असली तरी गाजावाजा केला जात असल्याचा आरोप माजी महापौरांनी केला आहे.
नक्की खरे कोण हे प्रश्नचिन्ह -भाभा रुग्णालयाला खोटे ठरवले जात आहे. रुग्णालय, पोलीस आणि मीडियालाही खोटे ठरवले जात आहे. नक्की खरे कोण हे प्रश्न उपस्थित झाले आहे. जखम नव्हती पण ती दाखवली जात होती. रुग्णालयाने त्या रक्ताचे नमुने घेऊन त्याची तपासणी करायला हवी होती. ०.१ ला जखम किंवा खरचटले, असे म्हटले जाते नाही. ती सुपरफिशल जखम होती. त्याचा गाजावाजा झाला, असे पेडणेकर यांनी म्हटले आहे.