महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठरलं... यंदा प्रत्यक्ष होणार शिवसेनेचा दसरा मेळावा? संजय राऊत यांची माहिती - संजय राऊत

यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने न होता प्रत्यक्ष होणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याविषयीची माहिती दिली आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठरलं? यंदा प्रत्यक्ष होणार शिवसेनेचा दसरा मेळावा?
ठरलं? यंदा प्रत्यक्ष होणार शिवसेनेचा दसरा मेळावा?

By

Published : Oct 6, 2021, 3:15 PM IST

Updated : Oct 6, 2021, 3:24 PM IST

मुंबई : यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने न होता प्रत्यक्ष होणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याविषयीची माहिती दिली आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रत्यक्ष होईल दसरा मेळावा

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दसरा मेळाव्याविषयी माहिती दिली आहे. यंदाचा दसरा मेळावा प्रत्यक्ष पद्धतीने होईल असे राऊत यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी शिवसेनेचे दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने झाला होता. यंदा मात्र हा मेळावा प्रत्यक्ष पद्धतीने होणार असल्याचे राऊत म्हणाले.

कोरोना नियमांचे पालन करून मेळावा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व बाबींचा विचार करून दसरा मेळाव्याविषयी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे राऊत यांनी म्हटले आहे. कोरोनाचे नियम पाळून दसरा मेळावा होईल असे ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच याविषयीचा निर्णय घेतील असे ते म्हणाले. दरम्यान, आता या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा -पहिल्यांदाच बंदिस्त सभागृहात होणार शिवसेनेचा दसरा मेळावा, सोशल मीडियावरून प्रसारण

Last Updated : Oct 6, 2021, 3:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details