मुंबई -आजपासून विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. खरंतर या अधिवेशनावरही कोरोनाचं मोठं संकट आहे. मागील दोन दिवसांपासून सरकारी अधिकारी-कर्मचारी यांच्या करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये जवळपास 40 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यात राज्यभरात विद्यापीठ परीक्षा, सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण, राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या, दुधाचा प्रश्न, ऊसाला हमीभाव देण्याचा प्रश्न, पूरपरिस्थिती,इ असे अनेक विषय ऐरणीवर आहेत. यावर कशा प्रकारे चर्चा होतीय, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सामना : विरोधकांसाठी 'सुशांतसिंह आत्महत्या', 'कंगणा रनौत' यांसारखे विषय राष्ट्रीय हिताचे
आजपासून विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. खरंतर या अधिवेशनावरही कोरोनाचं मोठं संकट आहे. सेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून याच विषयांवर उहापोह करण्यात आला आहे.
सेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून याच विषयांवर उहापोह करण्यात आला आहे. देशातील कोरोनची संख्या 40 लाखांवर गेली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 20 हजार 487 नवे रुग्ण आढळले आहेत. आरोग्य हीच आताच्या घडीला सरकारची प्राथमिकता आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. मागील दोन दिवसांपासून मुंबईत 1900 रुग्ण सापडत आहेत. पुढील दोन-तीन महिने आव्हान अधिक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र विरोधक सभागृहात धडपणे चर्चा करू देणार आहेत का, असा प्रश्न सामनातून विचारण्यात आला आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष हे म्हणे पोलीस अधिकाऱयांच्या बदल्यांवर सरकारला प्रश्न विचारणार आहेत. विरोधी पक्षाकडून सुशांतसिंह राजपूत, कंगणा रनौत अशा 'राष्ट्रीय हिताच्या' विषयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातील, असा टोलाही विरोधी पक्षनेत्यांना लावण्यात आलाय.