मुंबई - शिवसेना कोणाची? याचा निर्णय उद्या ( 22 ऑगस्ट ) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार supreme court hearing over shivsena vs shinde group आहे. धनुष्यबाणं चिन्ह कोणाचं?, अपात्र आमदाराचं काय?, शिंदे-फडणवीस सरकारचं काय होणार?, प्रकरण घटनापीठाकडे जाणार का?, यावरती उद्या निर्णय होणार shivsena vs shinde group आहे. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जे होईल ते होईल. आपला न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, या सर्व प्रकरणात जनतेच्या भावना या आपल्यासोबत असल्याचे मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं shivsena chief uddhav thackeray on supreme court hearing आहे.
'गद्दारांना धडा शिकवू' - विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या उपसभापती कार्याच्या अहवालाचे पुस्तक प्रकाशन मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांनी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले की, लोक निवडणुकीची वाट बघत आहेत. कधी एकदा निवडणूक येते आणि या गद्दारांना धडा शिकवू. मात्र, निवडणुका लवकर घेण्याची यांच्यात हिंमत नाही, असा टोला एकनाथ शिंदे गटाला उद्धव ठाकरे यांनी लगावला. यावेळी राज्यांमध्ये होणार्या महिला अत्याचारांवर देखील उद्धव ठाकरे यांनी बोट ठेवले. भंडारा जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची घडलेली घटना निंदनीय असून, न्याय मिळेपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही. या प्रकरणांत कोणताही जाती-धर्म आणता कामा नये, असा इशारा उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी पक्षाला दिला आहे.